सोलापुरातील संविधान प्रेमींनी साजरा केला लोकजागृतीचा अनोखा उत्सव - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, August 9, 2023

सोलापुरातील संविधान प्रेमींनी साजरा केला लोकजागृतीचा अनोखा उत्सव

 सोलापुरातील संविधान प्रेमींनी साजरा  केला  

लोकजागृतीचा अनोखा उत्सव

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सर्वपक्षीय, संविधानप्रेमी संस्था, संघटना व अराजकीय नागरी समुदायाच्या वतीने सोलापुरात ९ ऑगस्ट- क्रांतीदिन आणि जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आद्य हुतात्मे शहीद शंकर शिवदारे यांच्या स्मृती जपणाऱ्या 'बलिदान चौकात' लोकजागृतीचा उत्सव हा आगळा वेगळा उपक्रम पार पडला.
प्रारंभी आपल्या प्रास्ताविक भाषणात हसीब नदाफ यांनी कार्यक्रमाची पार्श्वभूमी विषद केली. ते म्हणाले, "हरियाणातील बहाद्दर नागरिकांनी विशेषतः जाट, गुजर, राजपूत आणि मुस्लिम समुदायाने सामूहिक निर्णय घेत विद्वेषी मनोवृत्तीने पछाडलेल्या जात्यांधांचा डाव हाणून पाडला आहे. 'माजोर सत्ताधीशांना चपराक लगावत खऱ्या अर्थाने देश.. धर्म.. मानवता.. संविधान यांचे रक्षण करण्यासाठी एकजुटीचा नारा त्यांनी बुलंद केला आहे. यापुढे जातीयवाद्यांना भीक घालायचे नाही! " असा जागो-जागचा हा निर्धार म्हणजे, आपला देश पुन्हा नव्याने जागा होत असल्याचे सुचिन्ह आहे. भारताला सुजलाम् सुफलाम् करण्याची ही नांदी आहे. त्याचेच हे सेलिब्रेशन. लोकं शहाणी होत असल्याचा उत्सव... म्हणजेच, लोकजागृतीचा उत्सव म्हणून सोलापुरातील संविधानप्रेमींच्या वतीने साजरा केला जात आहे."
आपल्या भाषणात राष्ट्रवादी (श.प.)पक्षाचे प्रांत सचिव शंकर पाटील यांनी, "महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनतेने याच क्रांती दिनी 'चले जाव !' म्हणत बलाढ्य ब्रिटीश साम्राज्यशाहीला हद्पार केले. आता आजच्या जातीयवादी शक्तींना, द्वेषावर आधारित राजकारण करणाऱ्या सत्ताधीशांना देखील आपण चले जाव..!!! असे निक्षून सांगत कायमचे पायउतार व्हायला भाग पाडू." असा विश्वास व्यक्त केला.
युवा नेते शेखर बंगाळे यांनी, "ज्याची सुरुवात हरियाणवी जनतेने करून दिली आहे आता आपणही, त्या उन्मादी, द्वेषमूलक, मस्त्वाल नराधमांना काबूत ठेवण्यासाठी आपला वाटा उचलूया. लोकजागर करीत संघर्षाचा वणवा सर्वदूर पसरवू या." असा निर्धार व्यक्त केला.
यावेळी अनिसचे ॲड. गोविंद पाटील, शिवसेनेचे समिऊल्लाह शेख, ॲड. प्रशिक नवघरे, रामचंद्र जगताप , संजय जोगीपेटकर, श्रीनिवास चित्तमपल्ली, छ.शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे मतीन बागवान, जाविद बद्दी, कॉग्रेसचे रुस्तुम कंपली, यशवंत फडतरे, आम आदमी पार्टीचे ॲड.सागर पाटील, ॲड. खतीब वकील, व्ही.डी.गायकवाड, मराठा सेवा संघाचे पोपटराव शिंदे, जमियत उलमा-ए-हिंदचे युसूफ प्यारे, भारत मुक्ती मोर्चाचे अशोक गायकवाड, राष्ट्रीय अत्याचार निवारण समितीचे अशोक बनसोडे, बहुजन क्रांती मोर्चाचे संतोष गजधाने, सोमनाथ भाटकर, सुर्यकांत शिवशरण, सुरेश ननवरे, निहार किरनाळे, सुचित्रा वाघमारे, अल्ताफ तांबोळी, श्रीकांत वाघमारे, सुषमा फडतरे, ज्येष्ठ नागरिक समन्वय समितीचे महादेव माने, म.न.पा.केंद्र २ शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता जाधव, अश्मा मुंडे, फरहाना तांबोळी, सविता जाधवर, मिलिंद खंदारे यांच्या सह शालेय विध्यार्थी- विध्यार्थिनी, विविध संघटनांचे कार्यकर्ते यांची उपस्थित लक्षणीय होती.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages