कागस्ट-मंगळवेढा मार्गावर बेकायदा दारू वाहतुक करणारी मोटर सायकल पोलिसांनी पकडली - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, August 9, 2023

कागस्ट-मंगळवेढा मार्गावर बेकायदा दारू वाहतुक करणारी मोटर सायकल पोलिसांनी पकडली

 कागस्ट-मंगळवेढा मार्गावर बेकायदा दारू वाहतुक करणारी मोटर सायकल पोलिसांनी पकडली


1 लाख 16 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त

 मंगळवेढा (कटूसत्य वृत) कागस्ट ते मंगळवेढा या मार्गावर बेकायदा दारू घेवून जाणारी बुलेट मोटर सायकल पोलिसांनी पकडून जवळपास बुलेटसह 1 लाख 16 हजार 720 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून सचिन जालिंदर मुंगसे (वय 32,रा.तळसंगी)याचेविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,दि.8 रोजी सकाळी 8.15 च्या दरम्यान कागस्ट ते मंगळवेढा मार्गावरून एक इसम दारू घेवून मोटर सायकलवरून जात असल्याची माहिती प्रशिक्षणार्थी पोलिस अधिकारी नयोमी साटम यांना मिळताच त्यांनी पोलिसांच्या मदतीने या मार्गावर सापळा लावला असता एम एच 13,सी.वाय.5090 ही मोटर सायकल येड्राव गावातील चौकात येताच पोलिसांनी हाताचा इशारा करून थांबवून तीची तपासणी केली असता पांढर्‍या रंगाच्या ठिक्यामध्ये 6 हजार 720 रुपये किमतीच्या 96 बॉटल  आयकॅप देशी दारू तसेच 1 लाख 10 हजार रुपये किमतीची रॉयल इनफिल्ड कंपनीची बुलेट गाडी असा एकूण 1 लाख 16 हजार 720 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages