ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त श्रद्धा विद्या मंदिर स्कूलच्या वतीने "तिरंगा रॅली "
मोहोळ( कुटूसत्य वृत्त):- श्रद्धा विद्या मंदिर मोहोळ येथे तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून प्रशालेचे संस्थापक श्री. सुनील झाडे उपस्थित होते .कार्यक्रमाची सुरुवात महात्मा गांधी यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली .कार्यक्रमाची प्रस्तावना प्रशालेचे मुख्याध्यापक .दिनेश नरळे यांनी केली, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेच्या सहाय्यक शिक्षिका पल्लवी गोडसे यांनी केले .रॅलीचे उद्घाटन प्रशालेचे व्यवस्थापक मिलन ढेपे यांच्या हस्ते करण्यात आले .या रॅलीमध्ये "वंदे मातरम, ""भारत माता की जय", "जय जवान ,जय किसान" या घोषणा देण्यात आल्या. विद्यार्थ्यांच्या हातात घोषणा फलक आणि तिरंगा झेंडा देऊन परिसरातून रॅली काढण्यात आली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रशालेच्या एच.ओ.डी. मोहिनी थोरात यांनी केले. कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव सुनील झाडे ल, व्यवस्थापक मिलन ढेपे, प्रशालेचे मुख्याध्यापक दिनेश नरळे, सर्व शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

No comments:
Post a Comment