...अखेर स्वयंघोषित राष्ट्रसंत एकनाथ महाराज लोमटे ला अटक , १८ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, August 16, 2023

...अखेर स्वयंघोषित राष्ट्रसंत एकनाथ महाराज लोमटे ला अटक , १८ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी!

  ...अखेर स्वयंघोषित राष्ट्रसंत एकनाथ महाराज लोमटे ला अटक ,  १८ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी!

कळंब तालुक्यात खळबळ .

कळंब (कटूसत्य वृत्त):- तालुक्यातील श्री दत्त मंदिर तीर्थक्षेत्र मलकापूरचे स्वयंघोषित  राष्ट्रसंत  एकनाथ लोमटे महाराजाला गेल्या वर्षी जुलै महिन्यात घडलेल्या महीला भविकाच्या विनय भंग प्रकरणावरून व  मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी, ..अखेर स्वयंघोषित राष्ट्रसंत एकनाथ महाराज लोमटे ला अटक व  १८ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी!झाल्यामुळे कळंब तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे .

या  प्रकरणात न्यायलायाच्या आदेशाने पिडीत महिला भविकेवर अत्याचार केल्या प्रकरणी अटक केली आहे.विनयभंग पिडीत महिला भाविकेने अत्याचार झाल्या प्रकरणी फौजदारी दाखल करुन न्यायालयात दाद मागीतली होती.न्यायालयाच्या आदेशाने एकनाथ लोमटे महाराजाला येरमाळा पोलिसांनी दि . १५ ऑगस्ट रोजी  पंढरपूर शहर  येथुन दुपारी २ वाजता अटक केली आहे.
श्री दत्त मंदिर तीर्थक्षेत्र मलकापूर येथे दर्शनासाठी आलेल्या महिलेस खोलीमध्ये बोलाऊन घेत महीलेच्या अंगास झोंबाझोंबी करीत महीलेचा विनयभंग करुन मारहान करत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मलकापुर येथील एकनाथ महाराज लोमटे विरुध्द येरमाळा पोलिस ठाण्यामध्ये गुंन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून  मिळालेली माहीती अशी  दि . २८ जुलै २०२२ रोजी गुरवार असल्याने मलकापुर येथील श्रीक्षेञ दत्त मंदीर संस्थान (मठ) चे राष्ट्रसंत तसेच भाविकांच्या सर्व समेस्येवर उपाय करणारे म्हणून सर्वत्र परिचीत असणारे ह.भ.प.एकनाथ महाराज लोमटे यांच्या दर्शनसाठी परळी येथील ३५ वर्षीय महीला मठातील दर्शन मंडपामध्ये बसली असता महाराजांनी महिलेस खोलीमध्ये  बोलाऊन घेत महीलेच्या अंगास झोंबाझोब करीत महीलाचा  विनयभंग केल्याची घटना गुरवार (दि.२८ रोजी २०२२) दुपारी.२ ते २:३०वाजेच्या सुमारास घडली होती .  यावेळी महीलेने प्रतीकार करताच महीलेस मारहान करुन जिवे मारण्याची धमकी दिली.सदरील प्रकार घडताच मंदीर परीसरामध्ये प्रंचड गोंधळ उडाला पण महाराजांनी सर्वत्र शांतता करत मंदीररातुन पळ काढला होता.त्याच मध्यरात्री येरमाळा पोलीस ठाण्यात पीडीत महीलेच्या फिर्यादीवरुन राष्ट्रसंत ह.भ.प.एकनाथ महाराज लोमटे विरुध्द गु.नं.१८९ / २०२२ कलम,३५४,३५४अ,३४१,३२३,५०४,५०६ प्रमाणे गुंन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणी महाराजाला महिनाभरात जामीनीवर सुटका झाली होती.
पण प्रकरण न्यायप्रविष्ट असताना पिढीत महिला भाविकेने अत्त्याचार झाल्या प्रकरणी फौजादारी दाखल करून न्यायालयात दाद मागितली होती.न्यायालयाच्या आदेशानुसार एकनाथ लोमटे महाराजला पिडीत महिला भाविकेवर अत्याचार केल्या प्रकरणी पंढरपूर येथुन पोलीसांनी अटक केली आहे . 
 चौकट
याप्रकरणी स्वयंघोषित राष्ट्रसंत लोमटे महाराज याची गुप्त खब र्‍याद्वारे पोलिसांना माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल भोजगुडे , पोलीस हवालदार सचिन राऊत , पोलीस नाईक राजू सय्यद , पोलीस कॉन्स्टेबल अमोल जाधव या टीमने लोमटे याला पंढरपूर शहरातून १५ ऑगस्ट रोजी दुपारी अटक केली व दि . १६ रोजी कळंब  न्यायालयासमोर पोलिसांनी हजर केले असता न्यायालयाने लोमटे याला १८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे . या प्रकरणाचा अधिक तपास कळंब पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक सुरेश साबळे हे करत आहेत . 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages