*नेताजी प्राथमिक शाळेत रक्षाबंधन उत्साहात* - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, August 30, 2023

*नेताजी प्राथमिक शाळेत रक्षाबंधन उत्साहात*

 *नेताजी प्राथमिक शाळेत रक्षाबंधन उत्साहात* 


   सोलापूर  (कटूसत्य वृत्त):- नीलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस मराठी प्राथमिक शाळेत रक्षाबंधन सण उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी कुंभार होत्या. प्रमुख अतिथी म्हणून नेताजी हायस्कूलचे मुख्याध्यापक रविशंकर कुंभार उपस्थित होते.यावेळी इयत्ता पहिली ते चौथीतील विद्यार्थिनींनी सर्व मुलांना राख्या बांधून,आरती ओवाळून, मिठाई वाटप करुन तसेच शैक्षणिक साहित्य ओवाळणी देवून रक्षाबंधन सण साजरा केला. इयत्ता तिसरीतील विद्यार्थिनींनी शाळेतील सर्व झाडांना राख्या बांधून कृतज्ञता व्यक्त केल्या. मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी कुंभार यांनी रक्षाबंधन सणाविषयी विद्यार्थ्यांना माहिती सांगून झाडे आपल्याला ऑक्सिजन, फळे, फुले, पाने, औषधी वनस्पती, मुळे, सावली, अनेक फर्निचर साहित्य विनामूल्य देतात अशा झाडांची रक्षण करणे आपले कर्तव्य आहे म्हणून सर्वांनी झाडांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी राख्या बांधण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. मुख्याध्यापक रविशंकर कुंभार  यांनी बहिण भावाचे अतूट नाते व्यक्त करणारी सण म्हणजे रक्षाबंधन असल्याचे सांगून शाळेतील प्रत्येक मुलींचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनीता पवार यांनी केले तर प्रशांत बत्तुल यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages