Hot Posts

6/recent/ticker-posts

श्री सिद्धेश्वर वुमेन्स इंजिनिअरिंगमध्ये टाईम मॅनेजमेंट,आईसब्रेकर आणि स्टार्टअपवर डॉ राजशेखर येळीकर यांचे व्याख्यान

 श्री सिद्धेश्वर वुमेन्स इंजिनिअरिंगमध्ये टाईम मॅनेजमेंट,आईसब्रेकर आणि

 स्टार्टअपवर डॉ राजशेखर येळीकर यांचे व्याख्यान

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- श्री सिद्धेश्वर वुमेन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या प्रथम वर्ष इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनींसाठी तीन आठवड्याचे स्टुडंट इंडक्शन प्रोग्राम सुरू आहे. यामध्ये आईस ब्रेकर आणि टाइम मॅनेजमेंट या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. श्री सिद्धेश्वर देवस्थान सोलापूरचे विश्वस्त व महाविद्यालयाचे संचालक मंडळ सदस्य डॉ राजशेखर येळीकर यांनी या विषयावर मार्गदर्शन केले. "कोणत्याही ध्येयाकडे समूहाने वाटचाल करायची असेल तर प्रथम समुहातील सदस्यांची एकमेकांशी दृढ परिचय असणे अतिशय गरजेचे आहे”, आणि यासाठी आईसब्रेकरच्या माध्यमातून स्वपरिचय तसेच आपल्या सहकाऱ्यांचे परिचय कसे करावे यासंदर्भात विद्यार्थिनींसाठी त्यांनी वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज घेतल्या. टाइम मॅनेजमेंट बद्दल मार्गदर्शन करताना दिवसातील 24 तासांचे नियोजन कसे करावे, यावेळेत काम करताना कामाचे प्राधान्य कसे ठरवावे. उच्च महाविद्यालयात शिकताना कोलॅबरेटिव्ह स्टडी म्हणजेच समूहाने अभ्यास करणे आणि एकमेकांच्या शंकांचे निरसन करणे या पद्धतीने अभ्यास केला तर याचा खूप फायदा होतो. स्टार्टअपबद्दल बोलताना ते म्हणाले की, फक्त चांगल्या कंपनीमध्ये प्लेसमेंट एवढेच ध्येय न ठेवता स्वतः चे स्टार्टअप सुरु करा. आपल्या आजूबाजूला समाजामध्ये बऱ्याच समस्या असतात, सहसा त्याकडे कोणाचेच लक्ष जात नसते. त्या समस्या ओळखून टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून त्यावर उपाय शोधणे म्हणजेच स्टार्टअपची सुरुवात आहे. त्यांनी विद्यार्थिनींना आवाहन केले की, जर तुमच्याकडे नवीन  व युनिक आईडिया असेल तर आम्ही त्याला संपूर्णपणे सपोर्ट करायला तयार आहोत. 

प्राचार्य डॉ टी ए चव्हाण यांनी विद्यार्थिनींनी आपले ध्येय निश्चित करून त्यानुसार वाटचाल करावी असे आवाहन केले. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सुवर्णा भरगंडे यांनी केले तर द्वितीय वर्ष कॉम्पुटरची विद्यार्थिनी रिद्धी शेटे हिने आभार प्रदर्शन केले. या प्रसंगी प्रथम वर्ष विभाग प्रमुख डॉ अविनाश पाटील, इंडक्शन प्रोग्राम प्रमुख  प्रा. संध्या पालमूर, प्रा.प्रियांका अंबुलगे, शिक्षक व विद्यार्थिनी उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments