Hot Posts

6/recent/ticker-posts

ग्रामीण भागातील प्रश्न कायम स्वरूपी मार्गी लावणार-प्रा.शिवाजीराव सावंत

 ग्रामीण भागातील प्रश्न कायम स्वरूपी मार्गी लावणार

-प्रा.शिवाजीराव सावंत 

माढा  (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आरोग्य मंत्री डाॅ.तानाजीराव सावंत यांच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा कायापालट होत असुन माढा तालुक्यातील ग्रामीण भाग सुजलाम सुफलाम करण्यासाठी  सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा.शिवाजीराव सावंत यांनी सांगितले.

सोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातुन मंजुर करण्यात आलेल्या खैराव बुद्रुकवाडी रस्ता व वाकाव गाव अंतर्गत रस्त्याच्या भूमिपूजन प्रसंगी प्रा.शिवाजीराव सावंत बोलत होते.अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या खैराव बुद्रुकवाडी तसेच वाकाव गावातील अंतर्गत रस्त्यांचे काम मार्गी लावल्याबद्दल प्रा.शिवाजीराव सावंत यांचा जाहीर सत्कार करुन फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला.रस्ते कामाचे भूमिपूजन प्रा.शिवाजीराव सावंत यांच्या प्रमुख हस्ते करण्यात आले.यावेळी युवा सेनेचे जिल्हाप्रमुख प्रियदर्शन साठे,शिवसेना तालुकाप्रमुख मुन्ना साठे,सत्यम लोंढे,वाकावचे सरपंच ऋतुराज सावंत,स्वप्नील खरात,संदीप सावंत,विक्रम कदम,शुभम बोधले,शरद सावंत,शिवाजी सावंत,नाना शेलार,संजय ढेरे,महेश मोहळे,बालाजी बारबोले,लहु बोराडे,अजित अनभुले यांचेसह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments