Hot Posts

6/recent/ticker-posts

मोहोळ मध्ये ठाकरे गटाला खिंडार

 मोहोळ मध्ये ठाकरे गटाला खिंडार

▪️ जिल्हाप्रमुख चरणराज चवरे उद्योजक राजू खरे यांच्या नेतृत्वाखाली

 शेकडो जणांचा शिवसेनेत प्रवेश

 कुरुल (कटूसत्य वृत्त):- शिवसेनेच्या झालेल्या विभागणीनंतर मोहोळ तालुक्यात देखील ठाकरे गट आणि शिंदे गट अस्तित्वात आले. या कालावधीत दोन्हीही गट थंड बस्त्यात होते. मात्र काल शिवसेनेच्या शिंदे गटाने धमाका उडवत ठाकरे गटाला खिंडार पडले असून शिवसेना जिल्हाप्रमुख चरणराज चवरे आणि उद्योजक राजू खरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी  गळ्यामध्ये भगवा टाकून तालुक्यातील दिग्गजांसहित शेकडो ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी शिंदे गटाच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. 

 तत्कालीन मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख  उद्धव ठाकरे यांनी सत्तेत असताना शिवसैनिकांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. मात्र एकनाथ शिंदे हे पायाला भिंगरी बांधल्या प्रमाणे महाराष्ट्रभर फिरतात, अहोरात्र जनतेची सेवा करतात, शिवसैनिकांना कधीही भेटतात अगदी सहज उपलब्ध होतात त्यामुळे आम्ही ओरिजनल शिवसेनेत प्रवेश केल्याचे उपजिल्हाप्रमुख दादासाहेब पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य दादासाहेब करणावर, माथाडी कामगार तालुकाप्रमुख तथा माजी सरपंच प्रकाश पारवे, विभाग प्रमुख समाधान खंदारे यांनी सांगितले. तर येणाऱ्या काळात ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीप्रमाणे येणाऱ्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मोहोळ तालुक्यात रखडलेला विकास साधणार असल्याचे जिल्हाप्रमुख चरणराज चवरे यांनी सांगितले.


 येणाऱ्या काळात आणखी प्रवेश

- मोहोळ तालुका हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. या तालुक्यासह मतदार संघात घराघरांमध्ये कडवट शिवसैनिक आहेत. मात्र या शिवसैनिकांची मोठ्या प्रमाणात कुचुंबना होत होती. प्रस्थापितांच्या विरोधात दंड थोपटणाऱ्या शिवसेनिकांना बोळीत गाठले जात होते. मात्र शिवसैनिकांच्या न्याय आणि हक्कासाठी येणाऱ्या काळात ताकदीने लढा देऊ आणि आणखी कडवट शिवसैनिकांचे प्रवेश घेऊ .असे राजू खरे, उद्योजक यांनी सांगितले



Reactions

Post a Comment

0 Comments