डॉ. कपिल बाळासाहेब कोरके यांना यंदाचा दलित मित्र गौरव पुरस्कारजाहीर
वैराग (कटूसत्य वृत्त):- जय जगदंबा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष डॉ. कपिल बाळासाहेब कोरके यांना यंदाचा दलित मित्र गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. दलित महासंघाच्या वतीने साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त हा पुरस्कार दिला जातो. शिक्षण क्षेत्रात त्यांनी भरीव कामगिरी केल्याने तसेच त्यांचे वडील कै.बाळासाहेब बप्पा कोरके यांनी ग्रामीण भागात शिक्षणाचे जाळे निर्माण केले. आपल्या वडिलांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी शिक्षणाचे जाळे अगदी घट्ट निर्माण केले आहे. त्यांनी शिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे.पुरस्काराचे वितरण रविवार, २७ ऑगस्ट रोजी यशवंतराव चव्हाण सभागृह बार्शी येथे दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मच्छिंद्र सकटे यांच्याहस्ते तसेच बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल माजी जि.प सदस्या सुरेखा कोरके, उज्जेश करडे, विनायकराव डोईफोडे, प्राचार्य खंडेराया घोडके, मुख्याध्यापक सुरेश गुंड, मुख्याध्यापक बाळासाहेब देशमुख, मुख्याध्यापक सुभाष सुरवसे, संजय खंदाड आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

No comments:
Post a Comment