तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत सावित्रीबाई फुले प्रशालेचे यश - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, August 19, 2023

तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत सावित्रीबाई फुले प्रशालेचे यश

 तालुकास्तरीय  शालेय बुद्धिबळ स्पर्धेत सावित्रीबाई फुले प्रशालेचे  यश


माढा(कटूसत्य वृत्त):- तालुकास्तरीय शालेय बुध्दीबळ स्पर्धेत माढ्यातील सावित्रीबाई फुले प्रशालेतील विद्यार्थ्यानी यश संपादन केले आहे.कुर्डुवाडी येथे आदर्श स्कूल मध्ये  १७ वर्ष मुलींच्या वयोगटात  अनुजा तानाजी काटे हिने तालुक्यात दुसरा क्रमांक  तर  कु.श्रावणी सचिन शिंदे हिने चौथा क्रमांक पटकवला आहे.
जुनिअर कॉलेज मधील १९ वर्ष मुलीच्या वयोगटात पवार वस्ती येथील कु.प्राची पांडुरंग पवार हिने तालुक्यात तिसरा क्रमांक संपादन केला आहे.यशस्वी  मुलींची सोलापूर येथील ज़िल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे.प्रशालेतील क्रीडाशिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले.संस्थेचे सचिव विठ्ठल नागटिळक यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages