शेटफळ शाळेच्या प्रांगणात अवतरले चांद्रयान ३! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, August 24, 2023

शेटफळ शाळेच्या प्रांगणात अवतरले चांद्रयान ३!

 शेटफळ शाळेच्या प्रांगणात अवतरले चांद्रयान ३!


      सोलापूर (कटूसत्य वृत्त):- विद्यार्थी हा कायम जिज्ञासू व चिकित्सक असला पाहिजे या हेतूने चांद्रयान चंद्रावर उतरण्याच्या पार्श्वभूमी वर शाळेतील उपक्रमशील शिक्षक रविंद्र देबडवार यांनी चांद्रयानाची हुबेहुब प्रतिकृती तयार करुन विद्यार्थ्यांना दाखवली. का?कसे?कुठे?कधी?कुणी? अशा प्रश्नांतून विद्यार्थी समस्यांचे पृथक्करण व निराकरण करण्याचा प्रयत्न करत असतात.हीच सवय पुढे शास्त्रज्ञ बनण्यासाठी उपयोगी पडते.यातूनच चांद्रयानाच्या विविध मोहीमा,चांद्रयानाची रचना,चांद्रयानातील उपकरणांची माहिती व कार्य,चांद्र मोहिमांचे यशापयश अशा विविध बाबींची माहिती देण्यात आली. मुलांनी विविध प्रश्न विचारुन माहिती घेतली.यावेळी चांद्रयानातील ऑर्बिटर, विक्रम लँडर, प्रग्यान रोव्हर यांच्याही प्रतिकृती बनविण्याचा अनुभव मुलांना देण्यात आला. शेटफळचे केंद्रप्रमुख सुदाम शिंदे,शाळेच्या मुख्याध्यापिका संगिता पाटील,जेष्ठ शिक्षिका माधुरी कुलकर्णी,शशिकांत जाडकर यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.याप्रसंगी सरिता थोरात,विठ्ठल पवार,संतोष लोंढे,रजिया तांबोळी,तनुजा इंगळे,मनिषा थोरात,मयूर गोणेकर,मनिषा वसेकर आदी शिक्षक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages