माळी महासंघ करमाळा तालुका अध्यक्ष पदी सामाजिक कार्यकर्ते तथा वांगी चे माजी सरपंच विठ्ठलराव शेळके यांची निवड - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, August 26, 2023

माळी महासंघ करमाळा तालुका अध्यक्ष पदी सामाजिक कार्यकर्ते तथा वांगी चे माजी सरपंच विठ्ठलराव शेळके यांची निवड

 माळी महासंघ करमाळा तालुका अध्यक्ष पदी सामाजिक कार्यकर्ते तथा वांगी चे माजी सरपंच विठ्ठलराव शेळके यांची निवड 


 करमाळा (कटूसत्य वृत्त):-. माळी महासंघा चे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश जी ठाकरे, प्रदेश अध्यक्ष अरुण जी तिखे , माळी महासंघ महाराष्ट्र राज्य किसान आघाडीचे प्रदेश अध्यक्ष शंकरराव वाघमारे यांच्या शी चर्चा करून जिल्हाध्यक्ष सुधाकर जांभळे सर यांनी ही निवड जाहीर केली आहे. आगामी एक वर्षा करिता ही निवड करण्यात आली आहे. 

या निवडीबद्दल करमाळा तालुका व वांगी परिसरात खुप आनंद व्यक्त करणेत येत आहे. या निवडी बद्दल राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश ठाकरे, प्रदेश अध्यक्ष अरुण तिखे, माळी महासंघ किसान आघाडीचे प्रदेश अध्यक्ष शंकरराव वाघमारे , प्रदेश सचिव चंद्रशेखर दरवडे, माळी महासंघाचे विश्वस्त भारत माळी, विभागीय महामंत्री रंगनाथ नाले, पंढरपूर तालुका अध्यक्ष शाम गोडसे , माढा तालुका युवक अध्यक्ष बालाजी राऊत, मोहोळ तालुका युवक अध्यक्ष सागर दादा वाघमारे, उत्तर सोलापूर चे युवक तालुका अध्यक्ष कृष्णात माळी,  माळी महासंघ जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश राऊत, जिल्हा सचिव नागनाथ व्यवहारे , माळी महासंघ विधी आघाडी सोलापूर जिल्हाध्यक्षा सौ. रेखाताई यादव , माळी महासंघ महिला आघाडी पंढरपूर तालुका अध्यक्षा सौ. वंदना देवकर , माळी महासंघ माढा तालुका महिला आघाडी अध्यक्षा सौ. मनीषा भानवसे , सौ. स्मिताताई जांभळे, उत्तर सोलापूर तालुका माळी महासंघ महिला आघाडी अध्यक्षा सौ. विजयाताई माळी, वीट चे सुभाष जाधव , मोरवड चे भास्कर नाले, आदी नी अभिनंदन केले आहे. माळी महासंघाचे विचार करमाळा तालुक्यातील सर्व गावापर्यंत पोहोचवून समाज संघटीत करणार असल्याचे या निवडी नंतर नूतन अध्यक्ष विठ्ठल शेळके यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages