सोलापूरच्या सुसंस्कृत राजकारणाला विकृत वि चा रां ची लागली नजर..! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, August 23, 2023

सोलापूरच्या सुसंस्कृत राजकारणाला विकृत वि चा रां ची लागली नजर..!

 सोलापूरच्या सुसंस्कृत राजकारणाला विकृत वि चा रां ची  लागली नजर..!


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शाहू फुले आंबेडकर या पुरोगामी विचारसरणीचा जिल्हा म्हणून सोलापूर जिल्ह्याची खरी ओळख सुसंस्कृत राजकारण म्हणून झालेले असताना अचानकपणे हे राजकारण वेगळ्याच वळणावरून जाताना दिसू लागले आहे. दोन दिवसांपूर्वी काँग्रेस भवन येथे दोन गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेली हाणामारी.. सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वत्र पोहोचली. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी हे प्रकरण जागेवर थांबवले सुद्धा..! परंतु हे कुठेतरी थांबलं तोपर्यंत शिस्तीचा पक्ष म्हणून टेंभा मिरवणाऱ्या भाजपामध्ये सुद्धा हाच आणि असाच प्रकार माजी नगरसेवक सुरेश पाटील आणि राजकुमार पाटील यांच्यामध्ये दिसून आला. सध्या कार्यकर्त्यांना संस्कृत विचार मिळत नसल्यामुळे विकृत विचाराची लागण होऊ लागल्यामुळेच सध्या प्रत्येक कार्यकर्ता आपल्या पक्षापेक्षा आपल्या गटातच जास्त रमू लागल्यामुळे तुतू मै मै मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे दिसतय. पक्षाचे विचार तळागाळात पोहोचवणे ऐवजी प्रत्येक नेता आपल्या गटाची जास्त काळजी करताना दिसत असल्यामुळेच असे प्रकार घडत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages