जिल्हा परिषदेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये धास्ती..!
खाबुगिरीला बसणार आता आळा..!!
सोलापूर (दादासाहेब नीळ):- जिल्हा परिषदेचे तत्कालीन सीईओ दिलीप स्वामी यांचा कर्मचाऱ्यांवर आणि अधिकाऱ्यांवर कोणताही वचक नसल्यामुळे अधिकारी आपल्या कर्तव्यात मोठ्या प्रमाणात कसूर करू लागले होते. प्रामाणिक आणि निष्कलंक सेवा एकही अधिकारी देत नाही त्यामुळे सर्वसामान्य माणसांमध्ये या अधिकाऱ्यांविषयी तीव्र नाराजी दिसून येते. प्रत्येक टेबलला खाबुगिरी वाढू लागल्यामुळे सर्वसामान्य शेतकरी आणि कष्टकऱ्यांना प्रचंड मोठा वेळ आणि पैसा खर्च करावा लागत आहे. परंतु जिल्हा परिषदेचा कारभार करणारा कारभार सीईओ दिलीप स्वामी यांची अचानक बदली झाल्यानंतर त्यांच्या जागेवर नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मनीषा आव्हाळे या नव्या कारभारीन जिल्हा परिषदेच्या भ्रष्ट आणि निरडवलेल्या अधिकाऱ्यांना वेसन घालू लागल्यामुळे सध्या मोठ्या प्रमाणात कर्मचारी आणि अधिकाऱ्यांमध्ये या कारभारणीची चर्चा होत असून सर्वांनीच प्रामाणिक काम करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवला आहे. कारण या कारभारणीची धास्ती सध्या मोठ्या प्रमाणात या कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना वाटू लागली आहे. त्यांनी नुकतीच दोन उपअभियंता एक ठेकेदार तीन अभियंत्यांना कारवाईची नोटीस पाठवल्यामुळे जिल्हा परिषदेमध्ये प्रचंड मोठी खळबळ उडाली आहे. जिल्हा परिषदेमध्ये गेल्या तीन वर्षापासून एकच कारभारी असल्यामुळे जिल्हा परिषदेची सर्वच यंत्रणा सुस्त आणि मस्त झालेली होती. परंतु तत्कालीन सीईओ दिलीप स्वामी यांनी एकाही अधिकाऱ्याला निलंबित केले नाही किंवा कोणावर कारवाई सुद्धा केली नाही. आपला कार्यकाळ त्यांनी कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना खुश ठेवूनच पार पाडल्याची चर्चा सुद्धा होऊ लागलेली आहे. परंतु सध्या त्यांची बदली झाल्यामुळे त्यांच्या जागेवर सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असणाऱ्या कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून मनीषा आव्हाळे यांनी जिल्हा परिषदेची सूत्रे हातात घेतल्यानंतर मात्र झोपलेले प्रशासन जागे झाले असून सर्वसामान्यांची कामे करण्यावर भर देऊ लागल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये सध्या आनंद आणि समाधानचे वातावरण दिसू लागलेले आहे. नव्याचे नऊ दिवस याप्रमाणेच ही कारवाई होईल त्यानंतर पुन्हा येरे माझ्या मागल्या याप्रमाणे जिल्हा परिषदेचा कारभार सुरू राहील अशी चर्चा सध्या मोठ्या प्रमाणात होत आहे. नूतन सीईओ मनीषा आव्हाळे यांनी कारवाईचे सत्र असेच टिकून ठेवावे आणि निष्क्रिय आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांना कायमस्वरूपी वेसन घालावी अशी मागणी सध्या शेतकरी वर्गातून मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे.
.png)
No comments:
Post a Comment