कोट्यावधी रुपये खर्चून बांधलेलं नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाचं कोसळलं छत...! घसरू लागली बांधकामाची पत..!! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, August 21, 2023

कोट्यावधी रुपये खर्चून बांधलेलं नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाचं कोसळलं छत...! घसरू लागली बांधकामाची पत..!!

कोट्यावधी रुपये खर्चून बांधलेलं नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाचं कोसळलं छत...! घसरू लागली बांधकामाची पत..!!

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- भौगोलिक दृष्ट्या सोलापूर जिल्ह्याचा कारभार सुरळीतपणे करता यावा या हेतूने कोट्यावधी रुपये खर्च करून सात रस्ता येथे नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाचे बांधकाम करण्यात आले. परंतु हे बांधकाम निकृष्ट प्रतीचे झाल्यामुळे अचानकपणे छत कोसळल्यामुळे या बांधकामाच्या दर्जा विषयी प्रश्नचिन्ह निर्माण झालेल् आहे. नव्याने बांधण्यात आलेल्या या जिल्हाधिकारी कार्यालयात अनेक सुविधांचा अभाव असून या कार्यालयात ये जा करण्यासाठी फक्त एकच प्रवेशद्वार आहे. नियमानुसार आत जाण्यासाठी वेगळं आणि बाहेर येण्यासाठी वेगळं प्रवेशद्वार असणं गरजेचं आहे. कारण ही इमारत विजापूर राष्ट्रीय महामार्गाच्या लगत असल्यामुळे या ठिकाणी वाहनांची आणि विशेषतः दुचाकी वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यामुळे दोन प्रवेशद्वार असणे गरजेचे असून या ठिकाणी गतिरोधक सुद्धा करणे अगत्याचे आहे. इमारत निकृष्ट दर्जाची असल्यामुळे अनेक अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये पाऊस पडल्यानंतर पाणी जातं. या इमारतीमध्ये नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सुद्धा सोय केलेली नसल्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेविषयी नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. एकाच कार्यालयातून सर्व कामकाज व्यवस्थित चालावे आणि येणाऱ्या नागरिकाला कोणताही त्रास होऊ नये याच हेतूने या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय उभा करण्यात आले आहे. परंतु या ठिकाणी नागरिकांना अधिकच त्रास सहन करावा लागत असल्यामुळे प्रशासन याकडे कधी लक्ष देणार का..? असा प्रश्न नागरिकांमधूनच विचारला जातो आहे. प्रशासन गतिमान होण्यासाठी प्रशासकीय इमारत सुद्धा दर्जेदार असणं गरजेचं असल्यामुळे ही इमारत दर्जेदार करावी अशी मागणी होत आहे. तात्पुरती मलमपट्टी करून कोणताही प्रश्न सुटत नाही त्यासाठी ठोस निर्णय क्षमता असावी लागते त्यासाठी नूतन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद या नवीन कार्यालयाला दर्जेदार कार्यालय बनवतील का..? असा प्रश्न सध्या नागरिकांमधूनच विचारला जातो.

 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages