युवासेनेने केला कर्नाटक सरकारचा निषेध - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, August 21, 2023

युवासेनेने केला कर्नाटक सरकारचा निषेध

 युवासेनेने केला कर्नाटक सरकारचा निषेध 

छत्रपति श्री शिवाजी महाराजांची मूर्ती हटविल्याचे प्रकरण

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- कर्नाटकातील बागलकोट येथे सार्वजानिक ठिकाणी बसविण्यात आलेली छत्रपति श्री शिवाजी महाराजांची मूर्ती हटविल्या प्रकरणी युवा सेनेने शनिवारी कर्नाटक सरकारचा निषेध केला. छत्रपति श्री शिवाजी महाराज चौकात युवासेनेने निषेध आंदोलन केले.
प्रारंभी युवा सेनेच्या युवासैनिकांनी छत्रपति श्री शिवाजी महाराजांच्या मूर्तीस दुग्धाभिषेक केला. यानंतर कर्नाटक सरकारचा निषेध करण्यात आला. हिंदूविरोधी कर्नाटक सरकारचा निषेध असो, कर्नाटक सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय, सिद्धारामैय्या यांचा धिक्कार असो, काँग्रेस सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा देण्यात येत होत्या.
यावेळी शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या प्रा. डॉ. ज्योती वाघमारे म्हणाल्या, हिंदुस्थानचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपति श्री शिवाजी महाराजांची मूर्ती हटविण्याचे महापाप काँग्रेस सरकारने केले आहे. ज्या काँग्रेसने छत्रपति श्री शिवरायांच्या मूर्तीस बुलडोझर लावला आहे त्या काँग्रेसला जनता आगामी निवडणुकांमध्ये बुलडोझर लावणार आहे. छत्रपति श्री शिवरायांच्या मूर्तीला अनधिकृत म्हणणारे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे यांची भूमिकाच अनधिकृत आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांनीही याबाबत सोयीस्कर मौन बाळगले आहे. त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा निषेध करावा, असे आव्हानही शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांनी दिले.
युवा सेनेचे जिल्हाप्रमुख प्रियदर्शन साठे म्हणाले, छत्रपति श्री शिवाजी महाराजांची मूर्ती भारतातील प्रत्येक गावात असणे आवश्यकच आहे. असे असतानाही बसविलेली मूर्ती काढून टाकण्याचा नतद्रष्टपणा काँग्रेसने केला आहे. त्याचा आम्ही युवासेनेतर्फे निषेध करीत आहोत.
याप्रसंगी शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या प्रा. डॉ. ज्योती वाघमारे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, युवासेना जिल्हाप्रमुख प्रियदर्शन साठे, युवासेना शहर प्रमुख अर्जुनसिंग शिवसिंगवाले, युवासेना उपशहर प्रमुख अभिजीत काळे, उपशहर प्रमुख अल्फान आबादिराजे, उपशहर प्रमुख सूर्योदन सुतार, उपशहर प्रमुख आशिष परदेशी, दिपक पाटील, स्वप्निल कांबळे, नागेश रोकडे, निहाल शिवशिंगवाले, मोहन जंगम, दत्ता कोपलवार, लखन म्हेत्रे, अभिषेक म्हेत्रे, भीमा वाघमारे, रोहन वड्डेपल्ली, सचिन गुंटनोळ आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages