तडवळे येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
कसबे तडवळे. (कटुसत्य वृत्त):- धाराशिव तालुक्यातील येथे 76 वां स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.गावातील जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श कन्या व केंद्र शाळा,जयहिंद विद्यालय या शाळेतील विद्यार्थ्यांची गावातून प्रभात फेरी काढण्यात आली.तसेच ग्रामपंचायत सोसायटी या ठिकाणी 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.यावेळी सरपंच सौ स्वाती जमाले, प्रसिद्ध उद्योजक मा. देवदत्त मोरे, उपसरपंच प्रताप (बंडू) करंजकर, माजी जिल्हा परिषद सदस्य कोंडाप्पा कोरे, विशाल जमाले,सुभाष धनके, कन्या शाळेचे मुख्याध्यापक रेहमान सय्यद,केंद्र शाळेचे मुख्याध्यापक केशव पवार, संजय वाघ,समस्त गावकरी मंडळी,सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर उपस्थित होते

No comments:
Post a Comment