पांगरीत 77 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा..! 
बार्शी (कटूसत्य वृत्त) : - बार्शी तालुक्यातील पांगरी येथेस्व. शोभाताई सोपल सेमी इंग्लिश स्कूल मध्ये मोठ्या उत्साहात 77 वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.
यावेळी चिमुकल्या मुलांनी अतिशय बहारदारपणे गगनभेदी घोषणा देत देशभक्तीचे वातावरण निर्माण केलं. त्याचबरोबर चिमुकल्यांनी अतिशय उत्कृष्टपणे इंग्लिश मधून भाषणे केली. सांस्कृतिक कार्यक्रम आणि भारदार कवायतीमुळे कार्यक्रमाची शोभा मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून आलं.
बार्शी बाजार समितीच्या सदस्या शालिनीताई गोडसे ,ज्येष्ठ माजी सैनिक सिद्धेश्वर मोरे,पत्रकार बाबा शिंदे, प्रगत प्रतिष्ठित शेतकरी आशिष घावटे आदी मान्यवर कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान बिबीशन गरड यांनी भूषविले.
प्रारंभी थोर हुतात्म्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आलं. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन, सरस्वती आणि महात्मा गांधी यांच्या प्रतिमा पूजन करण्यात आल. ध्वजारोहण शालिनीताई गोडसे यांच्या हस्ते करण्यात आले . त्यानंतर ध्वजाला सलामी देण्यात आली. राष्ट्रगीत व ध्वजगीत रसाळ वाणीने गायले. त्यानंतर सर्वांचे स्वागत हे स्वागत गीत गात प्रशालेच्या विद्यार्थिनींनी कार्यक्रमाची रंगत वाढविली. या गीतामुळे शालेय वातावरण अगदी उत्साहाने भरून गेले होते.
यानंतर मान्यवरांचा सत्कार प्रशालेचे विनायक गरड यांच्या हस्ते करण्यात आले.
याच प्रसंगी मोठ्या कौशल्याने प्रशालेतील नर्सरी पासून ते दुसरी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी अगदी सुंदर व मोहक अशी भाषणे केली. आणि अगदी याच उत्साहात वेगवेगळ्या चिमुकल्यांनी वेगवेगळ्या नेत्यांची महापुरुषांची वेशभूषा ही सादर केली.
या आनंदी वातावरणात आणखीन भर टाकण्यात आली ती म्हणजे प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांचे कवायत कसरती तसेच धाडसी वृत्तीचे प्रदर्शन करणाऱ्या कराटे ओशो ताय कांदो मार्शल आर्ट यांच्या भारदस्त प्रदर्शनाने.
ए टी एस ,आय टी एस स्कॉलरशिप , मंथन या परीक्षेमध्ये प्रशालीतील विद्यार्थ्यांनी यश खेचून आणल्यामुळे या गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रशालाचे वतीने
गुणगौरव करून त्यांना प्रमाणपत्र व मेडल्स चे वाटप करण्यात आले. .. ज्याप्रमाणे विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला त्याचप्रमाणे शिक्षकांनाही त्यांच्या गौरवास्पद उत्कृष्ट शिक्षक या ट्रॉफी देऊन करण्यात आले. यात कु. चांदणे मॅडम,. घावटे मॅडम आणि पालखे मॅडम यांचा समावेश करण्यात आला.
कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेल्या मान्यवर, अध्यक्ष ,ग्रामस्थ यांचे आभार प्रदर्शन पालखे मॅडम यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षिका पद्मजा मॅडम यांनी केले.
कार्यक्रमाचा समारोप प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून करण्यात आला.
No comments:
Post a Comment