शिक्षकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्या
दत्तात्रय सावंत यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
सोलापुर(कटूसत्य वृत्त):-बीएलओ ड्युटीत कर्तव्यात कसुर केल्याचा ठपका ठेऊन १८ शिक्षकांवर गुन्हे दाखल करण्यात आहे आहेत.शिक्षकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी मख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे माजी आमदार दत्तात्रय सावंत व श्रीकांत देशपांडे यांनी केल्याची माहिती डाॅ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे प्रदेश महासचिव सुनिल चव्हाण यांनी दिली.
माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत व श्रीकांत देशपांडे यांनी मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे ही मागणी केली.खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळांतील बीएलओ ड्युटीवरील कार्यरत १८ शिक्षकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.या संदर्भात डाॅ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय परिषद,महाराष्टृ राज्य शिक्षक सेना,युवक शिक्षक कर्मचारी संघटना व अखिल भारतीय उर्दु शिक्षक संघटनेच्या शिष्टमंडळाने माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांची भेट घेऊन संबंधित शिक्षकांना न्याय देण्याची विनंती केली. शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीत.गुन्हे दाखल झालेल्या शिक्षकांनी आपली कैफीयत सावंत यांच्यासमोर मांडली.यावेळी दत्तात्रय सावंत यांनी दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.त्यानुसार काल मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन या प्रकरणाची सर्व माहिती देऊन गुन्हे मागे घेण्याबाबत विनंती केली.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वीय सहाय्यक खतगावकर यांना जिल्हाधिकार्यांना गुन्हे मागे घेण्याबाबत निर्देश देण्याचे आदेश दिले.

No comments:
Post a Comment