अखेर तुळजापुर शिखर शिंगणापूर रस्त्याला रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांनी दिला हिरवा कंदील
माढ्यातुन भुताष्टे मार्गे शिंगणापूर ला जोडला जाणार महामार्ग,भाजपच्या व शिवसेनेच्या नेत्याच्या पाठपुराव्याला यश
महामार्ग मंजुुरीची प्रक्रिया अंतिम टप्यात
माढा (कटूसत्य वृत्त):-तुळजापूर शिखर शिंगणापूर तीर्थ क्षेत्र जोड महामार्ग करण्या प्रश्नी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ग्रीन सिग्नल दाखवला आहे.त्यामुळे माढा वैराग मार्गासह भुताष्टे भागातील रस्त्याचे भाग्य उजळणार आहे.हा महा मार्ग तुळजापुर,वैराग,माढ्यातुन चिंचोली,भुताष्टे,पडसाळी,भेंड, व्हळे,वरवडे,परिते,बेंबळे,वाफे गाव मार्गे शिखर शिंगणापूर ला ११९ कि.मी च्या अंतराने म जोडला जाणार असल्याचे पत्रच गडकरी यांनी दिले आहे.त्यामुळे या महामार्गाची वाहतूक मंत्री नितीन गडकरी लवकरच घोषणा करणार असुन मंजुरीची घोषणा करण्याची प्रक्रिया अंतिम टप्यात आली आहे.हा महामार्ग करण्या प्रश्नी माढ्याचे भाजपा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर,शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे,शिवसेनेचे संपर्कप्रमुख प्रा. शिवाजीराव सावंत,संजय कोकाटे आदींनी पाठपुरावा केला होता.आरोग्य मंत्री डाॅ.तानाजीराव सावंत यांना संपर्कप्रमुख प्रा.शिवाजीराव सावंत यांनी महामार्ग करण्याच्या मागणीसाठी पत्र दिले होते.त्यानुसार आरोग्य मंत्री डाॅ.तानाजीराव सावंत यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मार्ग करण्यासाठी मागणी केली होती.
भाजपाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचेसह शिवसेनेचे माढा लोकसभा संपर्कप्रमुख संजय कोकाटे यांनी वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन हा महामार्ग झाल्यास त्याचे महत्व मांडले होते.शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी देखील गडकरी यांची भेट घेऊन महामार्ग मंजुरी प्रश्नी आग्रही मागणी केली होती.एकदंरीतच लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याला यश मिळाले असुन खासदार राहुल शेवाळे यांना मंत्री नितीन गडकरी यांनी पत्र पाठवले असुन त्यात तुळजापुर शिखर शिंगणापूर हा ११९ कि मी.चा तीर्थयात्रा महामार्ग माढ्यातुन पडसाळी मार्गेच जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.त्यामुळे अनेक वर्षांपासून महामार्गाच्या प्रतिक्षेत असलेल्या माढा वैराग मार्गाचे व भुताष्टे भागातील शेतकऱ्याचे भाग्य नक्कीच उजळणार आहे.नागरिकांना आता महामार्गाला मंजुरी मिळण्याची प्रतिक्षा लागली आहे.
.jpg)
No comments:
Post a Comment