आ राम सातपुते यांच्या प्रयत्नातून 25/15 योजनेअंतर्गत 5 कोटीचा निधी मंजूर - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, August 21, 2023

आ राम सातपुते यांच्या प्रयत्नातून 25/15 योजनेअंतर्गत 5 कोटीचा निधी मंजूर

 आ राम सातपुते यांच्या प्रयत्नातून 25/15 योजनेअंतर्गत 5 कोटीचा निधी मंजूर

 अकलूज (कटूसत्य वृत्त):- माळशिरस तालुक्यातील विविध विकास कामांसाठी आ राम सातपुते यांनी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व आ रणजीतसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील विविध विकास कामांसाठी 25/15 योजनेअंतर्गत 5 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याने माळशिरस तालुक्यातील जनतेतून समाधान व्यक्त केले जात आहे.
    माळशिरस तालुक्याच्या विकासासाठी विविध योजना सातत्याने राबवून यासाठी राज्य सरकारकडून भरीव निधीची तरतूद करण्यात आ राम सातपुते सतत प्रयत्नशील असतात . तालुक्यातील विविध विकास कामांसाठी ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा करिता 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून यामध्ये तालुक्यातील बागेचीवाडी, गिरवी, दहिगाव,पाणीव, लोणंद, गुरसाळे, फडतरी, पिलीव ,तांबेवाडी, सवतगव्हाण, मेडद, विजय वाडी, झिंजेवस्ती, गिरझणी, मोरोची,बोंडले, रेडे, कचरेवाडी, खंडाळी, धानोरे, बिजवडी, उघडेवाडी, कन्हेर, कारुंडे, गणेशगाव, तांबवे, माळीनगर, चौडेशवरवाडी, पिसेवाडी, हनुमानवाडी, धर्मपुरी, दत्तनगर खंडाळी, फळवणी, सुळेवाडी, डोंबाळवाडी(कु) , कोंडबावी, लोंढेमोहितेवाडी या 37 गावांच्या विविध विकास कामांसाठी रस्ते, पिण्याची  पाणी टाकी, स्मशानभूमी दुरुस्ती, पेविंग ब्लॉक बसवणे , संरक्षक भिंत, सभामंडप आदी कामांना 5 कोटीचा निधी मंजूर झाला आहे.
    यामध्ये बागेचीवाडी , तांबेवाडी, सवतगव्हाण, मेडद, विजयवाडी, झिंजेवस्ती, गिरझणी, मोरोची, बोंडले, कचरेवाडी, खंडाळी, धानोरे, बिजवडी, उघडेवाडी, कण्हेर, कारुंडे, गणेशगाव, तांबवे, माळीनगर, चौंडेश्वरवाडी, पिसेवाडी, हनुमानवाडी, धर्मपुरी ,दत्तनगर खंडाळी, फळवणी, सुळेवाडी, डोंबाळवाडी, कोंडबावी, लोंढे मोहितेवाडी या गावांसाठी प्रत्येकी 10 लाख रुपये निधी मूलभूत सुविधा करता मंजूर झाला असून, गिरवी व फडतरी साठी 40 लाख रुपये , दहिगाव 25 लाख रुपये,पाणीव , लोणंद व रेडे या गावासाठी 20 लाख रुपये, गुरसाळे 30 लाख रुपये, पिलीव 15 लाख रुपये असा एकूण पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages