उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा 24 ऑगस्टला शिबीर दौरा कार्यक्रम
सोलापूर, (कटूसत्य वृत्त):- उप प्रादेशिक परिवहन कार्यालय अकलूज तर्फे दिनांक 17 ऑगस्ट 2023 रोजी टेभूर्णी येथे शिबीर कार्यक्रम नियोजित करण्यात आलेला होता परंतु प्रशासकीय कारणामुळे टेभूर्णी येथील शिबीर कार्यक्रम हा दि. 24 ऑगस्ट 2023 रोजी नियोजित करण्यात आले असल्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी कळविले आहे.
शिकाऊ तसेच पक्की अनुज्ञप्ती चाचणीसाठी ज्या नागरिकांनी दि. 17 ऑगस्ट 2023 रोजी पुर्वनियोजित अपॉईंटमेंट घेतलेल्या असतील अशा सर्व उमेदवारांनी दि. 24 ऑगस्ट 2023 रोजी टेंभूर्णी येथे शिबीर कार्यक्रमात उपस्थित रहावे. तसेच ज्या उमेदवारांना शिकाऊ किंवा पक्की अनुज्ञप्ती चाचणीसाठी शिबीर कार्यक्रमात उपस्थित राहणे शक्य नसल्यास त्यांनी कार्यालयामध्ये किंवा पुढील महिन्याच्या शिबीर कार्यक्रमात तारीख घेऊन त्या दिनांकास उपस्थित रहावे. असे आवाहनही उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी केले आहे.
.jpg)
No comments:
Post a Comment