जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समिती; अशासकीय सदस्यांच्या नियुक्तीसाठी 10 सप्टेंबर अर्ज करावेत - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, August 18, 2023

जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समिती; अशासकीय सदस्यांच्या नियुक्तीसाठी 10 सप्टेंबर अर्ज करावेत

 जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समिती; अशासकीय सदस्यांच्यानियुक्तीसाठी

10 सप्टेंबर अर्ज करावेत


सोलापूर, (कटूसत्य वृत्त):- जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक सोसायटी समितीवर अशासकीय सदस्यांची निवड करायची आहे. त्यासाठी इच्छुक पात्र उमेदवारांनी दि. 10 सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव करावेत असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. डी.ए. गिड्डे यांनी केले आहे.

सोलापूर जिल्हा प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायटीच्या (SPCA) व्यवस्थापकीय समितीवरील 10 ते 11 अशासकीय सदस्यांची नियुक्ती करावयाची आहे.  त्यासाठी इच्छुकांनी मा. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष सोलापूर जिल्हा प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायटी  सोलापूर यांच्या नावे संपूर्ण माहितीसह परिपूर्ण प्रस्ताव दि.10 सप्टेंबर 2023 पर्यत पाठवावेत. गोशाळा किंवा पांजर पोळ संस्थापैकी एका संस्थेचा अध्यक्षाचे एक पद, प्राणी कल्याण विषयक कार्य करणाऱ्या सेवाभावी संस्थाचे सदस्यांचे दोन पद, सर्वसाधारण समितीने नामनिर्देशीत केलेले दोन व्यक्ती, मानवहीत  किंवा  प्राणी कल्याणासाठी कार्य करणारे सदस्यांचे पाच ते सहा अशासकीय पद.

सोलापूर जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक सोसायटी समितीवर निवड करण्यासाठी इच्छुकांनी जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालय, नेहरू नगर, विजापूर रोड , सोलापूर-413004 या कार्यालयाकडे दि.10 सप्टेंबर 2023 पर्यंत कार्यालयीन वेळेत पाठवावेत असे आवाहनही जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. डी.ए. गिड्डे यांनी केले आहे


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages