दीपावली निमित्त अर्धनारी येथे किल्ला स्पर्धेचे आयोजन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, November 3, 2022

दीपावली निमित्त अर्धनारी येथे किल्ला स्पर्धेचे आयोजन

 दीपावली निमित्त अर्धनारी येथे किल्ला स्पर्धेचे आयोजन


मोहोळ (कटूसत्य वृत्त):-अर्धनारी तालुका मोहोळ येथे सह्याद्री फिउंडेशन सोलापूर आयोजित दीपावली सणा निमित्त भव्य किल्ला बांधणी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या, यामध्ये एकूण साठ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. यात लहान व मोठा गट करण्यात आला होता, यामधून लहान गटातून 1) रुद्र अभिजित यादव प्रथम क्रमांक, 2) योगिराज सिद्धेश्वर पवार द्वितीय क्रमांक, 3) संग्राम अमोल चव्हाण तृतीत क्रमांक तर मोठ्या गटातून   1) पृथ्वीराज पवार प्रथम क्रमांक, 2) रजवर्धन पवार द्वितीय, 3)प्रणव पवार तृतीय क्रमांक तर उत्तेजनार्थ रणवीर पवार याने नंबर पटकावला आहे, यावेळी परिक्षक म्हणून लक्ष्मण नागणे सर, युसूफ तांबोळी सर यानी काम पाहिले, यावेळी ज्ञानेश्वर शिंदे, प्रशांत ढवळे, सचिन टाकणे, बालाजी लोहकरे, सुराज डोके, उमेश सरवळे, ज्ञानेश्वर पवार, भारत कोळी, अमोल पवार, चंद्रकांत गवळी, प्रदीप पवार, महेश निकम, संदेश सुरवसे,  गोपीनाथ जाधव आदींनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages