मोहोळ तालुक्यातील कामती वाघोली वाफळे सर्कलमधील अतिवृष्टी झाल्यामुळे त्वरित पंचनामे करावेत अन्यथा रस्त्यावर उतरू - प्रभाकर भैया देशमुख - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, November 3, 2022

मोहोळ तालुक्यातील कामती वाघोली वाफळे सर्कलमधील अतिवृष्टी झाल्यामुळे त्वरित पंचनामे करावेत अन्यथा रस्त्यावर उतरू - प्रभाकर भैया देशमुख

 मोहोळ तालुक्यातील कामती वाघोली वाफळे सर्कलमधील अतिवृष्टी झाल्यामुळे त्वरित पंचनामे करावेत अन्यथा रस्त्यावर उतरू - प्रभाकर भैया देशमुख 

मोहोळ (कटूसत्य वृत्त):-मोहोळ तालुक्यामध्ये पावसाळा संपून सुद्धा अवकाळी पाऊस पडल्यामुळे कामती वाघोली वाफळे या भागातील सर्कल मधील तसेच खुनेश्वर व वडदेगाव अर्धनारी बेगमपूर व इतर भागातील पिक आणि फळ बागा अक्षरशा उध्वस्त झालेले आहेत तरी त्वरित पिकांचे फळबागांचे पंचनामे करावेत या मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मा मोहोळचे नायब तहसीलदार भालचंद्र यादव साहेब यांना देण्यात आले गुडघ्या इतके फळबागा आणि पिकांमध्ये पाणी साचलेल आहे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे प्रपंच उद्धव झालेले आहेत शेतकरी हवालदिल झालेला आहे त्यामुळे त्वरित पिकांची व फळबागांची पंचनामे करून शासनाने हेक्टरी पिकांना तीस हजार रुपये व फळबाग यांची हेक्टरी नुकसान भरपाई 70 हजार रुपये त्वरित त्यांच्या खात्यावर जमा करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैय्या देशमुख यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस साहेब यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे शेतकरी लकडाऊन कोरोनामुळे तसेच गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टी मुळे उध्वस्त झालेला आहे त्यामुळे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांची नुकसान भरपाई त्यांच्या खात्यावर जमा करावी व त्यांचे उद्ध्वस्त झालेले प्रपंच वाचवावेत यावेळी चंदू निकम नाना मोरे शिवाजी जाधव अण्णा कोळेकर बालाजी कदम उपस्थित होते.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages