पल्लवी साळवे सुवर्ण तर समाधान मुसळे रौप्य पदकाने सन्मानित - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, November 3, 2022

पल्लवी साळवे सुवर्ण तर समाधान मुसळे रौप्य पदकाने सन्मानित

 पल्लवी साळवे सुवर्ण तर समाधान मुसळे रौप्य पदकाने सन्मानित


शिक्षणमहर्षी रा.गे.शिंदे महाविद्यालयाचे घवघवीत यश


 कुर्डुवाडी (कटूसत्य वृत्त):- परांडा येथील शिक्षणमहर्षी गुरुवर्य रा.गे. शिंदे महाविद्यालयातील  तृतीय वर्षाची विद्यार्थिनी पल्लवी साळवे आणि प्रथम वर्षाचा विद्यार्थी समाधान मुसळे या दोन विद्यार्थ्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद आणि व्यंकटेश महाजन महाविद्यालय उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने 1 नोव्हेंबर रोजी उस्मानाबाद येथे आयोजित केलेल्या आंतर महाविद्यालयीन मैदानी स्पर्धेमध्ये अनुक्रमे पल्लवी साळवे हिने 200 मीटर आणि 400 मीटर या दोन मैदानी स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकाविले तर समाधान मुसळे याने 100 मीटर मैदानी स्पर्धेत रोप्य पदक पटकाविले.या दोन्ही विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ.कृष्णा परभने यांचे मार्गदर्शन लाभले. दोन्ही विद्यार्थ्यांची निवड डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद या सेंट्रल झोन मध्ये करण्यात आली आहे.या विद्यार्थ्यांचे श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ उस्मानाबाद संस्थेचे सचिव संजय निंबाळकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनील जाधव यांनी अभिनंदन व कौतुक केले. तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी यांनीही यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या दोन्ही विद्यार्थ्यांच्या यशस्वीतेमुळे परांडा तालुक्यातील शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी कौतुक केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages