भूकंप सोलापुरात आणि हादरले कोल्हापुरात... - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, November 3, 2022

भूकंप सोलापुरात आणि हादरले कोल्हापुरात...

 भूकंप सोलापुरात आणि हादरले कोल्हापुरात...


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात भ्रष्टाचाराच्या जाळ्यात एक मोठा मासा सोलापुरात गळाला लागला पण या माशा भोवतीकडे करणारा छोटा मासा मात्र पळाला असंच म्हणावे लागेल.
भ्रष्टाचार करणे पाप आहे अशा प्रकारच्या वल्गना करायच्या आणि स्वतः मात्र भ्रष्टाचाराची साखळी तयार करून मालामाल व्हायचे .
उत्तर सोलापूर तालुक्यातील एका शाळेतील एक प्रकरण पुढे ढकलण्यासाठी त्यावर स्वाक्षरी करण्यासाठी या अधिकाऱ्याने हजारो रुपयांची मागणी केली हे प्रकरण 50 हजारावर डील करण्यात आले. आणि 25 हजार रुपयाची लाज घेताना लाच लुचपत अधिकाऱ्यांनी रंगेहात या शिक्षणाधिकाऱ्याला पकडल्यामुळे सोलापूर जिल्ह्यासह राज्यात मोठी खळबळ उडाली आहे.
एकीकडे प्रामाणिक असल्याचा आव आणायचा आणि दुसरीकडे अंधारातून खोऱ्याने पैसा ओढायचा ही नीती या अधिकाऱ्यांनी अवलंबल्यामुळे शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्राला भ्रष्टाचाराची कीड लागल्याचे यातून दिसत आहे एकंदरीत या भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे शिक्षण क्षेत्रामधील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आलाय हे मात्र निश्चित.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages