राष्ट्रवादीचे उत्तम जानकर यांनी घेतली उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट तर्क-वितर्कांना उधाण - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, November 3, 2022

राष्ट्रवादीचे उत्तम जानकर यांनी घेतली उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट तर्क-वितर्कांना उधाण

 राष्ट्रवादीचे उत्तम जानकर यांनी घेतली उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट तर्क-वितर्कांना उधाण

 
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी नुकतीच माळशिरस तालुक्यातील राष्ट्रवादीचे नेते उत्तम जानकर यांना समवेत घेऊन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथील सागर या निवासस्थानी भेट घेतली आहे. त्यामुळे तालुक्यात तर्क वितरकांना उधाण आले आहे. 
शहाजीबापूंनी सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात नवा तीर मारण्याचा ‘उत्तम’ प्रयत्न केला असला तरी मोहिते-पाटील यावर काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या सोलापूर जिल्हा भाजपाचा गड झाला आहे. अपक्षासह ७ आमदार आणि दोन खासदारांमुळे पक्ष भक्कम स्थितीत आहे. अल्पावधीत भाजपाने राजकीय किमया साधत सोलापूर जिल्ह्यावर निर्विवाद वर्चस्व निर्माण केले आहे.

सत्तांतरानंतर भाजपात येण्यासाठी अनेक नेते उत्सुक झाले आहेत. अशातच आता शिंदे गटाचे आमदार असलेले शहाजीबापू पाटील यांनी उत्तम जानकर यांना घेऊन थेट फडणवीस यांची भेट घेतली आहे. त्यामुळे जानकर राष्ट्रवादी सोडण्याच्या विचारात आहेत की काय अशी चर्चा तालुक्यात सुरू झाली आहे.
भाजप-सेनेची सत्ता असताना जानकर हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून भाजपबरोबरच होते. त्यांना माळशिरसमधून उमेदवारी मिळेल, असे वाटत होते. मात्र ऐनवेळी भाजपाने राम सातपुते यांना उमेदवारी दिल्याने जानकर यांनी राष्ट्रवादीची वाट धरली होती. आता फडणवीस यांची भेट घेतल्याने जानकर पुन्हा भाजपच्या जवळ येणार का, अशी चर्चा तालुक्यात सुरू झाली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages