जास्त क्षेत्रफळ असणारी आणि साडेतीन कोटी रुपये शिल्लक ठेव असणारी अनगर नगरपंचायत राज्यातील एकमेव उदाहरण- माजी आमदार राजन पाटील - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, November 3, 2022

जास्त क्षेत्रफळ असणारी आणि साडेतीन कोटी रुपये शिल्लक ठेव असणारी अनगर नगरपंचायत राज्यातील एकमेव उदाहरण- माजी आमदार राजन पाटील

 जास्त क्षेत्रफळ असणारी आणि साडेतीन कोटी रुपये शिल्लक ठेव असणारी अनगर नगरपंचायत राज्यातील एकमेव उदाहरण- माजी आ.राजन पाटील

                         

अनगर (कटूसत्य वृत्त):- अनगरसह वाडयातील माणसे विकासाला प्राधान्य देणारी असल्याने सर्वात जास्त क्षेत्रफळ असणारी आणि साडेतीन कोटी रुपये शिल्लक ठेव असणारी अनगर नगरपंचायत राज्यातील एकमेव उदाहरण असल्याचे प्रतिपादन माजी आमदार राजन पाटील यांनी आज येथे बोलताना केले.
  अनगर नगरपंचायत होऊन आज एक वर्ष पूर्ण झाल्या बद्दल नगरपंचायतीचा पहिला वर्धापन दिन त्यांच्या प्रमुख उपस्थितित संपन्न झाला. त्या प्रसंगी पाटील बोलत होते. प्रारंभी मुख्यकार्यकारी अधिकारी अनुप अग्रवाल, प्रशासकिय अधिकारी राजेंद्र गुंड, लेखापरीक्षक रोहीत कांबळे, राम शिंदे आदींसह नगर पंचायतीच्या सर्व कर्मचाऱ्यांचा ग्रामस्थांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
पाटील पुढे बोलताना म्हणाले, नगर पंचायत स्थाप ने साठी अजित दादा पवार यांचा सिंहाचा वाटा असून नामदार अब्दुल सत्तार, हसन मुश्रीफ, आणि तत्कालीन मंत्री महोदयांच्या सहकार्याने अनगर ग्रामपंचायतीची नगर पंचायत झाली. यामध्ये तोट्यापेक्षा फायदे अधिक असल्याचे सांगत ग्रामपंचायतीपेक्षा नगरपंचायतीला ३५ लाखांचे  वाढीव अनुदान मिळाले. आज पर्यंत ३ कोटी रुपये मिळाले असून ४ कोटी रुपये येणार आहेत. अनगर - कोंबडवाडीसह खंडोबाचीवाडी, कुरणवाडी (अ. ) , नालबंदवाडी या गावांचे आता नागरीकरण झाले असून पाणी, आरोग्य, दळणवळणाच्या सर्व सुविधा त्यांना नगरपंचायतीच्या माध्यमातून मिळणार असून अनगरसह चार वाडयांसाठी  पिण्याच्या पाण्यासाठी अमृत २ .० या  योजने मधून ६८.५५ कोटी रुपयांची तर विद्युत दाहीनीसाठी १ कोटी रुपये, अग्निशमन केंद उभारून वाहन खरेदीसाठी १ कोटी रुपये प्रस्तावीत असल्याचे त्यांनी सांगून नगर पंचायत करण्याच्या प्रस्तावावर कोणीही आक्षेप घेतला नाही त्या बदल सर्वांचे आभार मानले.याप्रसंगी अनगर ग्रामपंचायतीचे तत्कालीन ग्रामविकास अधिकारी सचिन कदम यांनी नगरपंचायतीसाठी आवश्यक कागदपत्रांची वेळेत पूर्तता केल्याबद्दल त्यांचा कृषीभूषण दादा बोडके यांचे हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी अनगर नगर पंचायत घनकचरा व्यवस्थापनाचा २ कोटी रुपयांचा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेत असल्याचे मुख्याधिकारी अनुप अग्रवाल यांनी या प्रसंगी सांगितले.
याप्रसंगी कृषिभूषण दादा बोडके, भागवत शिंदे, भगीरथ गुंड, नारायण गुंड, सचिन कदम, राम कदम, प्रकाश कोकरे, हिरा भाऊ शिंदे, किसन गुंड, रघुनाथ गुंड, भाऊराव गुंड,प्रविण शिंदे, मारूती पाटील, बाळासाहेब थिटे, अंकुश गुंड, गणेश जाधव, आगतराव गुंड, शंकर गुंड, आदी उपस्थित होते. अनगर, कोंबडवाडी, खंडोबाचीवाडी, कुरणवाडी ( अ.), नालबंदवाडी येथील नागरिक उपस्थित होते. महादेव माने यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.



No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages