जीवनाचा उपासक चरित्र ग्रंथाला राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, October 23, 2022

जीवनाचा उपासक चरित्र ग्रंथाला राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

 जीवनाचा उपासक चरित्र ग्रंथाला राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर


बार्शी (कटूसत्य वृत्त):- वार्ताहार-लेखक इंद्रजीत पाटील लिखित "जीवनाचा उपासक-कर्मवीर लाेहाेकरे गुरूजी" या चरित्र ग्रंथाला यावर्षीचा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला.या चरित्र ग्रंथाला हा पाचवा राज्यस्तरीय पुरस्कार असून समृद्धी प्रकाशन हिंगाेली यांनी या पुरस्काराची अधिकृतरित्या घाेषणा केली.महाराष्ट्रातील मानाचा समजल्या जाणाऱ्या "राष्ट्रीय संत नामदेव चरित्र पुरस्कार-२०२२" ने या चरित्र ग्रंथाला सन्मानित करण्यात येणार आहे.तसे अधिकृतरित्या पत्रक संयाेजक डाॅ.प्रा.श्रीराम कऱ्हाळे,मराठी विभाग प्रमुख,शिवाजी महाविद्यालय,हिंगाेली यांनी दिले.त्यामुळे .शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ,गाैडगाव या लाेहाेकरे गुरूजींच्या संस्थेचे सद्याचे अध्यक्ष विनायकराव गरड,सचिव पंडितराव लाेहाेकरे व इतर संचालक मंडळाने लेखक इंद्रजीत पाटील यांचे अभिनंदन केले व पुढील साहित्यिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.ग्रामीण भागातील एक नव लेखक आपल्या प्रभावी लिखाण शैलीने वाचकांची मने जिंकत आहे.साहित्य क्षेत्रात उत्तुंग भरारी घेत आहे.त्यामुळे गाैडगाव भागात त्यांचे विशेष काैतुक हाेत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages