मोहोळमध्ये आनंदाचा शिधा पोहचला - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, October 23, 2022

मोहोळमध्ये आनंदाचा शिधा पोहचला

 मोहोळमध्ये आनंदाचा शिधा पोहचला 

 मोरया स्वस्त धान्य दुकान येथे शिधा वाटपास प्रारंभ

मोहोळ (तात्यासाहेब काळे) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेला राज्य सरकारचा आनंदाचा शिधा मोरया ग्राहक सहकारी संस्था स्वस्त धान्य दुकान मोहोळ येथे पोहचला असून  त्याचा वाटप शुभारंभ  सोलापूर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद जिल्हा सदस्य राजन घाडगे यांचे शुभ हस्ते करण्यात आले.

राज्यातील गरिबांची दिवाळी गोड व्हावी, या प्रेरक हेतूने   रेशनकार्ड धारकांना आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता.  एक लिटर तेल, चणाडाळ, रवा व साखर (प्रत्येक एक किलो) अवघ्या शंभर रुपयांत या चार ही वस्तू एकत्रितपणे वितरीत करण्यात येणार होते.त्यानूसार मोहोळ येथील मोरया स्वस्त धान्य दुकान येथून आनंदाचा शिधा पाकिट वाटपास प्रारंभ झाला. यावेळी  मोरया स्वस्त धान्य दुकान चालक संतोष मस्के, मदतनिस खंडू कांबळे, पोपट जाधव, बापू खांडेकर, लक्ष्मण कसबे, रूपेश घाडगे आदींसह  शिधापत्रिका धारक लाभार्थी व ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थितीत होते. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages