बाळे पतसंस्थेत रंगणार दुरंगी सामना - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, October 23, 2022

बाळे पतसंस्थेत रंगणार दुरंगी सामना

 बाळे पतसंस्थेत रंगणार दुरंगी सामना


पंढरपूर  (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक व सेवक सहकारी पतसंस्था मर्यादित बाळे या पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक लागली असून या निवडणुकीत दुरंगी सामना लागणार आहे.

दिनांक 23 ऑक्टोबर रोजी समविचारी पॅनल ची बैठक पंढरपूर या ठिकाणी पार पडली. समविचारी पॅनल मधील सर्व उमेदवार व पतसंस्थेचे हित जपणारे , मार्गदर्शक ज्येष्ठ सभासद उपस्थित होते. समविचारी पॅनल मध्ये सर्वसाधारण, नागरिकांचा मागास प्रवर्ग, भटक्या जमाती, अनुसूचित जाती व जमाती या प्रवर्गामध्ये अनेक इच्छुकांनी उमेदवारी दाखल केली आहे. काही इच्छुकांना यातून माघार घेणे भाग गरजेचे होते. या घटनेकडे विरोधक डोळे लावून बसले होते.

पंढरपूर येथे झालेल्या समविचारी बैठकीमध्ये ही समस्या अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सुटली. उमेदवारी दाखल केलेला प्रत्येक उमेदवार असे सांगत होता की ,"मी उमेदवारीतून  माघार घेण्यासाठी तयार आहे परंतु आपली पतसंस्था वाचली पाहिजे." त्यांना मार्गदर्शन करणारी बुजुर्ग मंडळी सुद्धा संस्थेच्या हिताचाच मुद्दा मांडत होते. त्यांनी माघार घेण्याची दर्शवणाऱ्या उमेदवाराची तोंड भरून कौतुक केले ‌. यामुळे हा तिढा अत्यंत सहजपणे सुटून तिसरा पॅनल निर्माण होणे टळले आहे.

याउलट

पतसंस्थेच्या निवडणुकीचा कार्यक्रम लपवून सभासदांना कोणत्याही विचारात न घेता ज्यांना जिल्ह्यामध्ये हुकूमशाही पद्धतीने राजकारण करावयाचे आहे, ही पतसंस्था आपल्या घशामध्ये घालायची आहे. अशी मंडळी सभासदांना अंधारात ठेवून ही पतसंस्था आपल्या मर्जीतील लोकांना पतसंस्थेच्या कारभारात आणून ही पतसंस्था कटपुतळी बाहुल्याप्रमाणे चालवण्याच्या विचारात आहेत. अशा विरोधी पॅनलच्या प्रमुखांना सर्वसामान्य सभासद जेव्हा अशा व्यक्तींना उमेदवार बदलावा. अशी विनंती करतात तेव्हा ते सध्या स्पष्टपणे व जाहीरपणे असे बोलतात की "मी त्यांना शब्द दिला आहे माझे उमेदवार बदलणार नाही". अर्थात त्यांनी कोणाला शब्द दिला? हे सर्वसामान्य सभासदांना समजेनासे झाले आहे. ‌ अशाप्रकारे ते लोकशाहीचा शिरच्छेद करण्यासाठी निघालेल्या        मंडळींना समविचारी पॅनलने मोठे आव्हान निर्माण केले आहे.

समविचारी पॅनल प्रमुख तात्यासाहेब बागल यांनी " आमचं ठरलंय असे सांगून सर्व उमेदवार आमच्याबरोबर आहेत. यथोचित वेळीच उमेदवारी अर्ज मागे घेऊन आमचा पॅनल परिपूर्ण करणारा आहोत." असे सांगून कोणता उमेदवार माघार घेईल हे स्पष्टपणे सांगण्यास नकार दिला. व विरोधकांची बत्ती गुल केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages