पापरीच्या सत्कार समारंभाकडे जिल्ह्याचे लक्ष - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, October 29, 2022

पापरीच्या सत्कार समारंभाकडे जिल्ह्याचे लक्ष

 पापरीच्या सत्कार समारंभाकडे जिल्ह्याचे लक्ष 

मोहोळ (कटूसत्य वृत्त):- मोहोळ तालुक्यातील पापरी ग्रामपंचायत व भोसले परिवाराच्या वतीने सोलापूर जिल्ह्यातील पहिली पायलट कुमारी ऋतुजाताई पाटील, रयत शिक्षण संस्थेचे सदस्य, डॉ. बाबासाहेब देशमुख व पु. अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे सिनेट सदस्य अजिंक्यराणा पाटील यांच्या भव्य सत्कार समारंभाचे आयोजन शनिवार दिनांक 29 ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता खंडोबा देवस्थान मैदान पापरी येथे करण्यात आल्याची माहिती आयोजक शिवाजी भोसले यांनी दिली.
हा सत्कार समारंभ माजी आमदार तथा पंचायत राज समितीचे माजी अध्यक्ष राजन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तर आ. रणजीतसिंह मोहिते पाटील व आ. यशवंत माने यांच्या हस्ते सत्कार होणार आहे.
मुंबई उच्च न्यायालयातील जेष्ठ विधीज्ञ,अॅड. महादेव (आप्पा) चौधरी, लोकनेते शुगरचे चेअरमन विक्रांत उर्फ बाळराजे पाटील,आण्णासाहेब देशमुख, नानासाहेब डोंगरे, प्रकाश चवरे, प्रकाश कस्तुरे, यशवंत (बापू) गुंड, हरीश्चंद्र चवरे, रणजित चवरे, सज्जन चवरे, जयश्रीताई शंकर कोळी, रमेश (तात्या) कचरे, रामदास चवरे, बबन (तात्या) गोडसे, सागर (मास्तर) चवरे, राजकुमार शहा, भाऊसाहेब सलगर, विजय कोकाटे, लक्ष्मण (तात्या) घागरे, सतिश भोसले, संजय शिंदे, अमोल भोसले यांच्या प्रमुख उपस्थिती हा कार्यक्रम होणार असून पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक शिवाजी भोसले, संजय भोसले, ग्रामपंचायत पापरी व समस्त ग्रामस्थ पापरीकरांनी केले आहे.सोलापूर जिल्ह्यातील दोन दिग्गज नेते या भव्य सत्कार समारंभा निमित्तांनी एकत्रित येत असल्याने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages