अहमदनगर महावितरणला लागले आठशे करोड रुपयांच्या विजचोरीचे ग्रहण, व्यवस्थापकीय संचालक विजय सिंगल माञ तेरी भी चूप मेरी भी चूप च्या भूमिकेत - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, October 21, 2022

अहमदनगर महावितरणला लागले आठशे करोड रुपयांच्या विजचोरीचे ग्रहण, व्यवस्थापकीय संचालक विजय सिंगल माञ तेरी भी चूप मेरी भी चूप च्या भूमिकेत

 अहमदनगर महावितरणला लागले आठशे करोड रुपयांच्या विजचोरीचे ग्रहण, व्यवस्थापकीय संचालक विजय सिंगल माञ तेरी भी चूप मेरी भी चूप च्या भूमिकेत


RTI राज्य उपाध्यक्ष योंगेद्र सांगळे यांनी उघड केला भ्रष्टाचार 

अहमदनगर (कटूसत्य वृत्त):- राज्यात महावितरण ही शासकीय वीज पुरवठा करणारी संस्था कार्यरत असून राज्यात ९५% महावितरण चे जाळे पसरले आहे. दिवसेंदिवस वीजवाढ ही होत असून विविध मार्गाने जनते कडून पैसा उकळला जातो हे ही तितकेच सत्य आहे, वर्षानुवर्षे महावितरण मध्ये करोडो रुपयांची वीजचोरी होत असून महावितरणचे अधिकारी यावर पडदा टाकत असून कोणत्याही प्रकारची कारवाई करत नसल्याचा आरोप आरटीआय ह्युमन राईट्स एक्टिविस्ट असोशिएसनचे राज्य उपाध्यक्ष योगेंद्र सांगळे यांनी केला आहे. 

सदर प्रकरण बाबत सांगळे यांनी दीड वर्षात माहिती अधिकार कायद्याच्या अंतर्गत वारंवार अर्ज, तक्रारी आणि माहिती घेतली असता असे निदर्शनास आले अहमदनगर जिल्ह्यातील महावितरण मंडळात एका वर्षात सुमारे ८०० कोटी रुपयांची वीजचोरी व वीजगळती होत असल्याचे निष्पन्न झाले.


वीजचोरीचा हा तोटा भरून काढण्यासाठी कंपनी विजदेयकात वाढ करणे, वेगवेगळे टॅक्सेस लावणे असे उद्योग करत असून त्यामुळे प्रामाणिक पणे वीज देयके भरणाऱ्या ग्राहकांना याचा भुर्दंड बसत आहे. ही अत्यंत गंभीर बाब आहे, याबाबत महावितरण चे व्यवस्थापिकिय संचालक श्री विजय सिंघल यांना वारंवार तक्रार करून ही सदर प्रकरणावर कोणतीही कारवाई होत नसून प्रकरण दाबले जात आहे, योगेंद्र सांगळे यांच्या माहिती नुसार नाशिक जिल्हा परिमंडळाचे मुख्य अभियंता दिपक कुमठेकर वरिष्ठ अधिकारी यांना खोटे आणि बनावट अहवाल देत आहेत. जाणीव पूर्वक माहिती लपवत आहेत.

महावितरण ही शासनाची अभिकृत संस्था असून खाजगी वीज पुरवठा करणाऱ्या अंबानी, अदाणी यांच्या पेक्षा जास्त वाढीव भावाने लोकांना वीज विकत असून लोकांकडून मोठ्या प्रमाणात पैसा काढला जात आहे. शासन तसेच प्रशासकीय अधिकारी, ऊर्जा सचिव जाणून बुजून सदर प्रकरणावर दुर्लक्ष करीत आहेत. योग्य नियोजन नसणे, कनिष्ठ अधिकाऱ्याची जबाबदारी निश्चित न करणे, वरिष्ठ अधिकारी यांना वरची मलाई खाण्यात जास्त स्वाऱस्य असण्याने सदर प्रकरणावर बोलण्यास व कारवाही करण्यास कोकण प्रादेशिक विभागाचे सह व्यवस्थापकीय संचालक श्री. चंद्रकांत डांगे पुढे येत नाही. श्री डांगे यांच्या कडे सदर प्रकरण असून कीत्येक तक्रारी, कारवाही करणे बाबत चौकशी चे आदेश दिले असून अजून कारवाही होत नाही.


सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन कारवाही करणे आणि लोकांना फसवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणे अपेक्षित आहे.सांगळे यांच्या माहिती नुसार असाच मोठा घोटाळा याआधी ही झाला असून ३००० कोटीचा सबसिडी भ्रष्टाचार झाला असून झोपलेल्या लोकांमुळे प्रशासनाने याबाबत सद्य पर्यंत कोणतीही कारवाई केलीली नाही .त्या मुळे दोषी भ्रष्ट अधिकारी निर्भिड पणे राजरोस असे भ्रष्टाचार करत आहेत.   मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सदर प्रकरणात जातीने लक्ष घालून जनतेला फसवणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यावर कारवाही करून जनतेची फसवणूक थांबवणे महत्वाचे आहे. तसेच जनतेने सुद्धा सदर भ्रष्टाचार विरोधात आवाज उठवणे गरजेचे आहे.


         जनतेला तांत्रिक बाबी सांगून करोडोंची लूट दिवसाढवळ्या करीत आहेत.त्याकडे महावितरण कंपनीचे वरिष्ठ अधिकारी आणि राजकिय पुढारी दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.

वर्षानुवर्षे महावितरण मध्ये करोडो रुपयांची वीज चोरी होत असून त्यावर नियंत्रण न ठेवता सदर घोटाळ्यावर महावितरणचे अधिकारी पडदा टाकत आहेत.  कोणतीही कारवाही होत नाही.येत्या आठ दिवसांत दोषीवर नाहीकारवाई केली तर राज्यभर जनआदोलन करणार असल्याचा इशारा  योगेंद्र सांगळे, (राज्य उपाध्यक्ष, आरटीआय ह्युमन राइट्स एक्टिविस्ट असोशिएशन) यांनी दिला आहे.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages