मोहोळ तालुक्यातील सोनाली ऑग्रोचे दिनकर थोरात 'निष्ठेला सलाम' या पुरस्कारांनी सन्मानित - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, October 21, 2022

मोहोळ तालुक्यातील सोनाली ऑग्रोचे दिनकर थोरात 'निष्ठेला सलाम' या पुरस्कारांनी सन्मानित

 मोहोळ तालुक्यातील सोनाली ऑग्रोचे दिनकर थोरात 'निष्ठेला सलाम' या पुरस्कारांनी सन्मानित 

    मोहोळ (कटूसत्य वृत्त):- जळगाव येथील प्रख्यात असलेल्या जैन इरिगेशन सिस्टिम्स लीमिटेड कंपनीच्या वतीने मोहोळ तालुक्यातील सोनाली ऑग्रोचे मालक दिनकर बाबुराव थोरात यांना 'निष्ठेला सलाम' (सॅल्युट टु लॉयल्टी) या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

    मुंबई येथील हॉटेल ताज येथे जैन उद्योग समूहातील विक्रेत्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून नुकतीच विक्रेता परिषद (डीलर कॉन्फरन्स) आयोजित करण्यात आली होती.

    याप्रसंगी जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांच्या हस्ते दिनकर(दादा) थोरात यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

    जैन इरिगेशन कंपनीची डीलरशिप घेतल्यानंतर दिनकर दादा थोरात यांनी परिसरातील शेतकऱ्यांचा विश्वास संपादीत करुन ग्राहकांना आवश्यक ते साहित्य उपलब्ध करुन देण्याचे काम केले. त्यामुळे कंपनीच्या वतीने 'सॅल्युट टु लॉयल्टी' (निष्ठेला सलाम)  पुरस्कारासाठी दिनकर(दादा) थोरात यांची निवड करण्यात आली. यावेळी  जैन इरिगेशनची कायमच शेतकऱ्यांशी बांधिलकी असल्यामुळे जैन इरिगेशनचे प्रत्येक उत्पादन शेतकऱ्यांच्या विकासाला पूरक ठरेल असे मनोगत यावेळी अशोक भाऊ जैन यांनी यावेळी व्यक्त केले.

    जैन उद्योग समूहाने मागील काळात अनेक अडचणींवर मात केली आहे. आशा अडचणीच्या काळात ही विक्रेते व शेतकरी जैन उद्योग समूहासोबत ठाम उभा राहीला आहे. असेही शेवटी अशोक भाऊ जैन यांनी मनोगतात सांगितले.

    या विक्रेता परिषदे (डीलर कॉन्फरन्स) मध्ये राज्यातून १७१ तर जिल्ह्यातून ९ वितरक सहभागी झाले होते. यामधून देवडी, ता.मोहोळ येथील दिनकर बाबुराव थोरात (सोनाली ऍग्रो एजन्सीज,मोहोळ) यांना कंपनीच्या वतीने दिला जाणारा 'निष्ठेला सलाम' (सॅल्युट टु लॉयल्टी) हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

    या पुरस्कारांनी सन्मानित केल्यानंतर दिनकर थोरात म्हाणाले की, जैन इरिगेशन कंपनीने मला सन्मानित केल्यामुळे आता आणखीन आमची जबाबदारी वाढलेली आहे. यापुढील काळात ही जैन इरिगेशन सिस्टिम्स लीमिटेड कंपनी व शेतकरी या दोघांचा विश्वास सोनाली ऑग्रो कायम राखेल असेही थोरात यांनी सांगितले. 

    दिनकर थोरात यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल देवडी गावातील, मोहोळ तालुक्यातील अनेक प्रतिष्ठीत व्यक्तींनी व शेतकऱ्यांनी अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages