भाजपाच्या युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष पदी रणजित चवरे यांची नियुक्ती - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, October 21, 2022

भाजपाच्या युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष पदी रणजित चवरे यांची नियुक्ती

 भाजपाच्या युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष पदी रणजित चवरे यांची नियुक्ती



मोहोळ (कटूसत्य वृत्त):-पेनूर येथील रणजित चवरे यांची सोलापूर जिल्हा भाजप युवा मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड झाली आहे. या निवडीबद्दल पेनूर येथे भव्य नागरी सत्कार पार पडला.आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांचे समर्थक म्हणून परिचित असलेले पेनूर येथील रणजित चवरे यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची सोलापूर जिल्हा भाजप युवा मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी निवडीचे पत्र जिल्हा संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते पाटील, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश घोडके, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर यांच्या हस्ते देण्यात आले होते. दरम्यान या निवडीबद्दल पेनूर येथे भव्य नागरी सत्कार पार पडला.

यावेळी भाजपाचे मोहोळ तालुकाध्यक्ष सुनील चव्हाण, लोकसेवक संजय क्षीरसागर, सरचिटणीस रमेश माने, सरचिटणीस सतिश पाटील, हर्षवर्धन पाटील, दादासाहेब इंगोले, उपसरपंच विजय कोकाटे, तेजस बोबडे, सचिन गुंड, गुरूराज तागडे, मारुती गवळी, दत्तात्रय चवरे, ज्ञानेश्वर माने, दादा सलगर, अरुण चव्हाण, संजू शेख, सचिन चवरे, सुहास चवरे, राजू सलगर, कुंडलीक टेकळे ,शितल चवरे, विकी सलगर ,बाळासाहेब चवरे , बालाजी चवरे, निलेश चवरे, सोमनाथ चवरे आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages