ग्राहक समिती तर्फे सरकारने शेतकऱ्यांना अतिवृष्टी झाल्या मुळे ओला दुष्काळ जाहीर करून आर्थिक मदत करावी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, October 22, 2022

ग्राहक समिती तर्फे सरकारने शेतकऱ्यांना अतिवृष्टी झाल्या मुळे ओला दुष्काळ जाहीर करून आर्थिक मदत करावी

ग्राहक समिती तर्फे सरकारने शेतकऱ्यांना अतिवृष्टी झाल्या मुळे ओला दुष्काळ जाहीर करून आर्थिक मदत करावी



मोहोळ (कटूसत्य वृत्त):- ग्राहक समिती तर्फे सरकारने शेतकऱ्यांना अतिवृष्टी झाल्या मुळे ओला दुष्काळ जाहीर करून आर्थिक मदत करावी यासाठी तहसील साहेबांना निवेदन देण्यात आले.
     सद्या महाराष्ट्रात पावसाने हाहाकार माजविला आहे. जमिनीमध्ये सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे पिके वाया जाऊन मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सद्या दिवाळी सणासाठी शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत. खरीप पिके वाया गेली. रब्बी पिकांसाठी बियाणे, खते मशागती साठी पैसे नाहीत. वापसा नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
   त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. शेतकरी बांधवांना या अस्मानी संकटातून बाहेर काढण्या साठी सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट आर्थिक मदत जाहीर करावी.अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा ग्राहक समिती तर्फे निवेदनात देण्यात आला आहे.
  प्रदेश अध्यक्ष तानाजीराव गुंड यांच्या अध्यक्षतेखाली नायब तहसीलदर यादव साहेब याना देण्यात आले.
    यावेळी संतोष कोल्हळ जिल्हा अध्यक्ष. ता. अध्यक्षआनंदराव देशमुख. ता. कार्याध्यक्ष बबनराव नारुटे, शहर अध्यक्ष दाजी नीचल, जि. उपाध्यक्ष अमोल सावंत, मागासर्गीय जि. अध्यक्ष महादेव जाधव, दिव्याग विभाग जिल्हा अध्यक्ष मनोज धोत्रे, तालुका महिला अध्यक्ष लता ताई पाटील, शहर महिला अध्यक्ष अंजली ताई मोहिते इत्यादी अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages