तारण नव्हे कारण बघून कर्ज देणारी मोहोळ नागरी पतसंस्था : राजन पाटील - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, October 6, 2022

तारण नव्हे कारण बघून कर्ज देणारी मोहोळ नागरी पतसंस्था : राजन पाटील

 तारण नव्हे कारण बघून कर्ज देणारी मोहोळ नागरी पतसंस्था : राजन पाटील


मोहोळ (कटूसत्य वृत्त):- आजच्या उद्योग व्यवसायाच्या गतिमान युगात अर्थसाह्य वेळेत होणे गरजेचे आहे.त्यामुळेच लोकनेते बाबुराव अण्णा पाटील यांनी मोहोळ शहरात मोहोळ नागरी सहकारी पतपुरवठा संस्थेची स्थापना केली. मोहोळ नागरी पतसंस्था ही केवळ तारण न पाहता कारण पाहुन अर्थसाह्य करणारी एकमेव पतसंस्था आहे. व्याजावर व्याज न घेणाऱ्या या पतसंस्थेने हजारो लघु व्यावसायिकांना उद्योजक केले ही निश्चितपणे अभिमानास्पद बाब आहे असे गौरवोदगार माजी आमदार राजन पाटील यांनी काढले.

 अंजनगाव खे. ता. माढा येथे या पतसंस्थेच्या आठव्या शाखेचे विश्वनाथ वाघमोडे देव यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन झाले. यावेळी अध्यक्ष स्थानावरून बोलताना पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजन पाटील बोलत होते. यावेळी चेअरमन डॉ.कौशिक गायकवाड, व्हॉइस चेअरमन तथा मोहोळचे उपनगराध्यक्ष प्रमोदबापू डोके, संदीपभैय्या पाटील, व्यवस्थापक मुस्ताक शेख, नारायण गुंड हे उपस्थित होते.

यावेळी नाना देव वाघमोडे, ब्रह्मदेव भोसले, आप्पासाहेब वाघमोडे सरपंच, पांडुरंग चौगुले, कृषीभुषण दादा बोडके, सतीश भोसले, अंजनगाव सोसायटीचे चेअरमन धनराज पाटेकर, नगरसेवक संतोष खंदारे, नारायन गुंड, प्रविण नाना डोके, नागनाथ सोनवणे, चंद्रकांत वाघमोडे वैभव गुंड, राकेश देशमाने, जयवंत गुंड, हुजुर ईनामदार, खालीद शेख, शकील शेख, राजु सुतार, अनंद गावडे , विक्रम गुंड, बापु ढोले, प्रविण सोनवणे, व समस्त गावकरी आणि मोहोळ नागरी पतसंस्थेचे पतसंस्थेचे अधिकारी  आणि कर्मचारी वृंद उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages