विविध शिक्षक संघटनांच्या वतीने अनगर येथे अजिंक्यराणा पाटील आणि पायलट ऋतुजा पाटील यांचा सन्मान - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, October 6, 2022

विविध शिक्षक संघटनांच्या वतीने अनगर येथे अजिंक्यराणा पाटील आणि पायलट ऋतुजा पाटील यांचा सन्मान

 विविध शिक्षक संघटनांच्या वतीने अनगर येथे अजिंक्यराणा पाटील आणि पायलट ऋतुजा पाटील यांचा सन्मान


मोहोळ (कटूसत्य वृत्त):- मोहोळ तालुक्याच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये जिल्हा परिषद शाळांचे मोठे योगदान आहे. मोहोळ तालुक्याने सातत्याने जिल्ह्यामध्ये उच्च गुणवत्तेचा झेंडा फडकवत मोहोळ तालुक्याच्या शैक्षणिक गुणवत्तेचा जिल्हाभर लौकिक निर्माण केला आहे. शिक्षण क्षेत्रातील गुरुजन बांधवांनी माझ्या परिवारातील यशस्वी सदस्यांचा केलेला सत्कार निश्चितपणे इतरही विद्यार्थ्यांना प्रेरणादायी असल्याची भावनिक कृतज्ञता माजी आमदार राजन पाटील यांनी व्यक्त केली.
मोहोळ तालुका गुरुसेवा शिक्षक परिवार व मोहोळ तालुक्यातील विविध शिक्षक संघटनांच्या वतीने अजिंक्यराणा पाटील यांची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर च्या अधिसभा (सिनेट) सदस्यपदी निवड झाल्याबद्दल आणि सोलापूर जिल्ह्यातील पहिली महिला पायलट कु. ऋतुजाताई राजन पाटील या बंधू-भगिनीचा सत्कार अनगर येथे माजी आमदार राजन पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला यावेळी शिक्षक बांधवांना मार्गदर्शन करताना राजन पाटील बोलत होते.
     यावेळी सोलापूर जिल्हा आदर्श शिक्षक समितीचे अध्यक्ष राजकुमार राऊत, सोलापूर जिल्हा शिक्षक संघाचे कोषाध्यक्ष आप्पासाहेब देशमुख, एकल मंचचे जिल्हा सरचिटणीस विजय वाघमारे, अध्यक्ष महावीर उन्हाळे, अध्यक्ष हनुमंत बंडगर,अध्यक्ष नेताजी रणदिवे, अध्यक्ष गिरीश वनकळसे, अध्यक्ष हजरत शेख,चेअरमन रणजित थिटे,नामदेव कूचेकर, तानाजी गुंड,  चेअरमन परमेश्वर गुंड, श्रीमंत गुंड, नंदकुमार जाधव, आबा टेकळे, दिपक पारडे, बिभीषण खंदारे, अनगर केंद्राचे केंद्रप्रमुख महादेव माने सर आणि मोहोळ तालुक्यातील सर्व शिक्षक संघटनाचे पदाधिकारी आणि अनगर व अनगर परिसरातील बहुसंख्य शिक्षक शिक्षिका आदी उपस्थित होत्या.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages