श्रीसंत कुर्मदासच्या 13 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ,- कारखान्याचे श्री संत कुर्मदास हे नाव कदापि बदलणार नाही-चेअरमन अॅड.धनाजीराव साठे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, October 6, 2022

श्रीसंत कुर्मदासच्या 13 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ,- कारखान्याचे श्री संत कुर्मदास हे नाव कदापि बदलणार नाही-चेअरमन अॅड.धनाजीराव साठे

 श्रीसंत कुर्मदासच्या  13 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ,- कारखान्याचे श्री संत कुर्मदास हे नाव कदापि बदलणार नाही-चेअरमन  अॅड.धनाजीराव साठे 


माढा (कटूसत्य वृत्त):- सध्याच्या काळात साखर कारखानदारीमध्ये अनेक कारखानदार  सहकारी कारखान्यांचे खाजगीकरण करून  आपल्या घरातील पूर्वजांची नावे कारखान्याला देत आहेत.
संतश्रेष्ट कुर्मदास महाराजांच्या आशीर्वादाने ही जागा मिळाली असुन संत कुर्मदास हे कारखान्याचे नाव कदापीही बदलणार नाही असे मत  कारखान्याचे संस्थापक चेअरमन तथा माजी आमदार अॅड.धनाजीराव साठे यांनी व्यक्त केले.
श्री.संत कुर्मदास साखर कारखान्याच्या  १३ व्या गळीत हंगामाच्या शुभारंभाप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. प्रारंभी ह.भ.प डाॅ.जयवंत बोधले महाराज धामणगावकर यांच्या हस्ते गव्हाणीत मोळी टाकून गाळप हंगामाचा शुभारंभ करण्यात आला.
चेअरमन माजी आ.साठे यांनी कारखान्याच्या  अडचणींचा काळ आता संपला असून सहकार महर्षी गणपतराव साठे यांनी घालून दिलेल्या सहकाराचा वारसा आणि श्री संत कुर्मदास महाराज व स्व विलासराव देशमुखांच्या आशीर्वादाने लवकरच कारखाना इतर कारखान्याबरोबर ऊसाला दर देईल अशा आशावाद व्यक्त केला.
हभप जयवंत बोधले महाराज आपल्या भाषणात म्हणाले साठे परिवाराने पैशापेक्षा माणसे जास्त कमावली.भूतकाळाचे स्मरण वर्तमानाची जाणीव आणि भविष्याचे चिंतन हा त्रिवेणी संगम असणारा साठे परिवार सामजिक बांधिलकी जोपासत तालुक्याच्या राजकारणात सक्रिय आहे.
संचालक दादासाहेब साठे यांनी स्व विलासरावांच्या निधनानंतर वक्रदृष्टीला सामोरे गेलेल्या या कारखान्यास ऊर्जितावस्था आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असून मागील हंगामातील एफआरपीची उर्वरित रक्कम २२००  रूपया दराप्रमाणे लवकरच देणार असल्याचे सांगितले. 
प्रारंभी श्री.संत रामदास महाराज सहकार महर्षी गणपतराव साठे स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या प्रतिमांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले
कार्यक्रमास पंढरपूर खरेदी-विक्री संघाचे चेअरमन शांतिनाथ बागल,शिवशक्ती अर्बन बँकेचे जनरल मॅनेजर श्री.उमाटे, व्हाईस चेअरमन सुधीर पाटील,संचालक दादासाहेब साठे,
नगराध्यक्षा मीनल साठे,कारखाना संचालक  भालचंद्र पाटील,विठ्ठल शिंदे,हरिदास खताळ,राहुल पाटील, मधुकर चव्हाण,विजयसिंह पाटील,सयाजी पाटील,बाळासाहेब पाटील,नारायण गायकवाड,सिराज  शेख,शंकर नाईकवाडे, शालिनी कदम,बालाजी पाटील,संध्याराणी खरात,उपनगराध्यक्षा कल्पना जगदाळे,अॅड.बी.डी.पाटील,
नगरसेवक अरुण कदम,नितीन साठे,कार्यकारी संचालक बाळासाहेब पवार,हनुमंत राऊत,चंद्रकांत कांबळे,समाधान राऊत  आदीसह ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मण राऊत यांनी तर आभार प्रदर्शन संचालक नारायण गायकवाड यांनी केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages