माता सुरक्षित तर घर सुरक्षित,देश सुरक्षित : सुदीप चाकोते

सोलापूर (कटूसत्य वृत्त):-कांचन फाउंडेशन च्या वतीने चाकोते प्रसूती ग्रह जोडभावी पेठ येथे माता सुरक्षित तर घर सुरक्षित या उपक्रम अंतर्गत महिलांचे प्रसूती संदर्भात मोफत तपासणी व उपचार करण्यात आले तसेच नवरात्रीचा औचित्य साधून नारीशक्ती म्हणून डॉक्टर्स नर्स व प्रसुतीला आलेल्या सर्व महिलांचा तुळशी रोप देऊन त्यांचं सत्कार करण्यात आले. तसेच दवाखान्यात वृक्षारोपण केले .यावेळी डॉ अलकुंटे सर, डॉ इंगळे मॅडम,डॉ मुत्सवार मॅडम, सोलापूर विद्यापीठ चे नूतन सिनेट सदस्य ज्यांचे सत्कार करण्यात आले नितीन व्हॅनमाणे, सागरा आतनुरे, अक्षय अंजीखाने, कल्याणराव चौधरी, सतीश पारेली, नूर अहमद नालवर, श्रीकांत दासरी चंद्रकांत टिक्के, नागराज बिराजदार कांचन फाउंडेशनचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment