आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांचा विकासनिधीचा धडाका..! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, October 21, 2022

आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांचा विकासनिधीचा धडाका..!

 आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांचा विकासनिधीचा धडाका..!


बोरगांव पाणी पुरवठा योजनेसाठी १३ कोटींच्या आराखड्यास मंजुरी

अकलूज (कटूसत्य वृत्त):-  महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या उपसमितीच्या बैठकीत माळशिरस तालुक्यातील,  १३ कोटी रूपयांच्या बोरगाव पाणी पुरवठा योजनेस तांत्रिक मंजूरी प्राप्त झाल्याने सन २०५४ पर्यंतचा म्हणजे पुढील तीस वर्षांपर्यंतचा बोरगावमधील नागरिकांचा पिण्याचा पाणी प्रश्न मिटणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्यातून व उपमुख्यमंत्री देंवद्र फडणवीस यांच्या माध्यमातून पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्याने जल जीवन मिशन अंतर्गत १३ कोटी ७५ लाख रूपयांच्या बोरगाव पाणी पुरवठा योजनेस तांत्रिक मंजूरी मिळाली आहे. भिमा नदीवरील करोळे बंधाऱ्यावरून महाळुंग जॅकवेलच्या शेजारून पाणी उचलले जाणार आहे,व बोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पाठीमागे जलशुद्धीकरण केंद्र उभारले जाणार आहे तिथून बोरगाव व वाड्या वस्त्यांकरीता साठी पिण्याचा पाणी पुरवठा होणार आहे.

आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी माळशिरस तालुक्यात विकास निधीचा धडका लावला असून ऊर्जा क्षेत्राता करीता ७० कोटी रूपये ,निमगाव पाणी पुरवठा योजनेस 33 कोटी रूपये व बोरगाव पाणी पुरवठा योजनेस 13 कोटी रूपये मागील दहा दिवसात तब्बल ११६ कोटी रूपये विकास निधी आणला असून खऱ्या अर्थाने सत्तेचा सदुपयोग कसा करायचे हे आ.रणजितसिंह मोहिते-पाटील दाखवून देत आहेत. बोरगाव पाणी पुरवठ्यासाठी बांधण्यात येणाऱ्या टाक्या बोरगाव-2 लाख ८ हजार लिटर पालखी तळ-1 लाख 2 हजार लिटर डी 19-62 हजार लिटर.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages