लीड स्कूल च्या विद्यार्थ्यांकडून ''सामाजिक जन-जागृती अभियान"

कुर्डूवाडी (कटूसत्य वृत्त):- लीड स्कूलच्या वतीने मंगळवार दिनांक १८ ऑक्टोबर रोजी स्टुडंट्स लेड कॉन्फरन्स अंतर्गत गो-ग्रीन या विषयावर आधारित सामाजिक जनजागृती अभियान मुख्याध्यापक वैभव अग्रवाल यांच्या मार्गदर्शना खाली घेण्यात आले.या अभियाना साठी कुर्डुवाडी नगरपरिषदचे सहकार्य लाभले.या सामाजिक जनजागृती अभियानाची सुरुवात सहाय्यक पोलिस निरीक्षक विक्रांत बोधे यांच्या शुभहस्ते श्रीफळ फोडून करण्यात आली.
या संपुर्ण अभियान रॅली मध्ये विशेष करून इयत्ता 6 ते 8 च्या विद्यार्थी यांनी "प्रदूषण थांबवा पृथ्वी वाचवा "या विषयावर नाटक सादर केले.स्कूल मधील इतर विद्यार्थ्यांनी
ध्वनी,वायु आणि जल प्रदूषण थांबवा,पाण्याचा काठकसरीने वापर करा, झाडे लावा झाडे जगवा, व स्वच्छतेचा संदेश दिला.

याप्रसंगी कुर्डूवाडी शहरातील सर्व महान समाज सुधारकांच्या मूर्तींना लीड स्कूल च्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी मुलांना अभियाना करता त्यांनी मनस्वी शुभेच्छा दिल्या.कुर्डुवाडी नगरपरिषद चे समन्वयक अभिजित पवार,बांधकाम विभाग चे जयसिंग लोखंडे यांनी मुलांना शुभेच्छा दिल्या.या रॅली साठी शाळा प्रशासक,स्कूल मॅनेजर सर्व शिक्षक समन्वयक,शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
कुर्डूवाडी शहरांमध्ये वृक्ष संवर्धन मोहीम, स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत "स्वच्छता के दो रंग" मोहीम तसेच "शहर सौंदर्यकरण" अभियान आणि "माझी वसुंधरा अभियान" जनजागृती कार्यक्रमाची अंमलबजावणी लीड स्कूल च्या वतीने करण्यात आली.

No comments:
Post a Comment