शिवशंकर बझारची दिवाळी बंपर ऑफर; आकर्षक सवलतीतुन होणार ग्राहकांची बचत
.png)
अकलूज (कटूसत्य वृत्त):- गेल्या 27 वर्षांपासून ना नफा ना तोटा या तत्वावर ग्राहकांच्या पसंतीच्या अग्रस्थानी असलेल्या शिवशंकर बझार ने दिवाळी सणासाठी बंपर ऑफर सुरु केली असून रौप्य महोत्सवपुर्ती निमित्त अनेक आकर्षक सवलती मधून ग्राहकांची 5 ते 50 टक्के पर्यंत मोठी बचत होणार असल्याची माहिती चेअरमन स्वयंप्रभादेवी मोहिते पाटील यांनी दिली. तसेच 5000 रूपयांच्या पुढील खरेदीवर गिफ्ट व्हाऊचर मिळणार असून 250 रूपयांपर्यंतच्या काठ पदर साडी, ड्रेस मटेरियल, सुटींग, शर्टींग, रेडीमेड शर्ट-पॅन्ट यापैकी एक वस्तू मोफत मिळणार असल्याचेही मोहिते-पाटील यांनी सांगितले.
उद्योगमहर्षी स्व.उदयसिंह मोहिते पाटील यांच्या ध्येय धोरणानुसार शिवशंकर बझार ची यशस्वी वाटचाल सुरु आहे. सहकाराच्या माध्यमातून सुरू असलेले शिवशंकर बझार आज राज्यातील नामांकित बझार म्हणून ओळखले जाते. मुख्य शाखेसह बझारच्या माळशिरस तालुक्यात 9 शाखा कार्यरत आहेत. स्वच्छ, निर्भेळ व माफक दरात ग्राहकांना मालाची विक्री करताना ग्राहकांच्या हिताला बझार ने नेहमीच प्राधान्य दिले आहे. येणार्या दिवळीतही आकर्षक सवलतीची योजना जाहीर केली असून या माध्यमातून ग्राहकांची मोठी बचत होणार आहे.
बझार च्या विविध योजनांची माहिती देताना व्यवस्थापक गोपाळराव माने देशमुख म्हणाले, एकावर एक फ्री योजने अंतर्गत पारले 20-20 600 ग्रॅम, के.एस.डिओ 150 मिली, पवित्रा अगरबत्ती, कुकवेल गुलाबजाम 200 ग्रॅम, मंगलदीप अगरबत्ती, गोवर्धन गुलाबजाम, परफ्युम 10 मिली, 25 मिली, डागा गुलाबजाम 200 ग्रॅम, सगरम शाही गुलाबजाम 180 ग्रॅम या वस्तू एकावर एक फ्री मिळणार आहेत.
छापील किंमतीवर बंपर डिस्काउंट योजनेत 150 रूपयांचा हाईड अॅण्ड सिक चोको रोल 1250 ग्रॅम 100 रूपयांत, 250 रूपयांचा न्युट्रीरीच क्लासिक हायजेस्टिक 1 कि. 150 रूपयांत, 150 रूपयांचा न्युट्रीरीच क्लासिक डायजेस्टिक 600 ग्रॅम 95 रूपयांत, 150 रूपयांचा हाईड अॅण सिक ब्लॅकबार्न 300 ग्रॅम 95 रूपयांत, 160 रूपयांचा रेम्को स्प्रे 40 मिली 90 रूपयांत, 198 रूपयांचा वेबलॉन स्प्रे 100 मिली 68 रूपयांत, 150 रूपयांचा जेबीएस रूम फ्रेशनर 600 मिली 95 रूपयांत, 225 रूपयांचा आरास डिओ 150 मिली 150 रूपयांत, 250 रूपयांचा मोमोज मॅजिक रूमफ्रेशनर 600 मिली 150 रूपयांत, 140 रूपयांचा सनफिस्ट मारी फॅमिली पॅक 1 किलो 115 रूपयांत, 72 रूपयांचा मोती साबण 65, 40 रूपयांचा 36 रूपयांमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे.
तसेच रामबंधू चिवडा व चकली मसाल्यांवर 15 टक्के सूट, पिळणकर चिवडा मसाला, चकली पीठ, अनारसे पीठ यावर 20 टक्के सूट, सुहाना चिवडा व चकली मसाल्यावर 15 टक्के सूट सुध्दा देण्यात येत आहे. याबरोबर कोणत्याही कंपनीच्या 15 लिटर अथवा किलोच्या तेल डब्यावर साई शुध्द हळद पावडर (25 ग्रॅम) मोफत देण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment