जकराया शुगरचा बारावा गळीत हंगाम मोठ्या उत्साहात संपन्न
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- जकराया शुगर लि. वटवटे ता.मोहोळ जि.सोलापुर कारखाण्याचा सन 2022–2023 या वर्षीचा बारावा गळीत हंगाम शुभारंभ दिनांक 17/10/2022 रोजी वार सोमवार सकाळी ठिक अकरा वाजता कारखाण्याचे संस्थापक/चेअरमन बिराप्पा भगवान जाधव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या प्रस्तावित भाषणात कारखाण्याचे कार्यकारी संचालक सचिन बिराप्पा जाधव म्हणाले की, चालु हंगामामध्ये ओव्हर ऑयलिंगची कामे पुर्ण झाली असुन आपल्या कारखाण्याकड़े दोनशे ट्रॅक्टर टोळ्या, 190 डंपिंग, 550 बैल गाड्या, 10 हार्वेस्ट इतक्या वाहनांचा करार झाला असुन पंच्याहत्तर टक्के यंत्रणा तोडणीसाठी हजर झाली असुन चालु हंगामासाठी कारखाण्याने पाच लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवन्यात आले आहे. चालु गळीत हंगामात नोंदी झालेल्या संपूर्ण ऊसाचे गाळप करनार आहे. या वर्षी ऊस उत्पादक शेतकर्यांना अधिकतम एफआरपी द्यावयाची असुन सुरुवातीस को 86032 या वानास प्राधान्य देवुन तोडणी प्रोग्राम सुरु करित आहोत. तरी ऊस उत्पादक सभासद, बिगर सभासद, भागातील शेतकर्यांनी घाई गडबडीने निर्णय न घेता जकराया कारखान्यवार विश्वास ठेवून कारखान्यास गळीतास जास्तीत जास्त ऊस द्यावा असे आवाहन या प्रसंगी त्यांनी केले.
यावेळी कारखाण्याचे संस्थापक चेअरमन अॅड. बिराप्पा जाधव यांनी सभासदांना दिला जानारा ऊस दर हा कश्याप्रकारे दिला जातो याची माहिती दिली, चांगल्या प्रतिचा ऊस सभासदांनी देवुन अधिकतम एफ.आर.पी. देण्याचा विश्वास कार्यक्रमाप्रसंगी दिला, कारखाण्याच्या रिकव्हरी बेसवर शेतकर्यांना चांगलाच दर देन्यात येईल , मागिल दोन हंगामा पूर्वीचे प्रति. मे. टन 50 रूपये प्रमाणे पुरवणी बिल दीपावली सन गोड करण्याकरीता सभासदांना दिले जाईल. रिकव्हरी चांगली बसली पाहिजे तर कारखाण्याला चांगला भाव देणे परवडनार आहे असे सांगितले.
याप्रसंगी कारखाण्याचे तज्ञ संचालक राहुल बिराप्पा जाधव , जकराया मल्टीस्टेट को–ऑफ. क्रेडिट सोसायटीच्या सी. ई. ओ. मनिषा सचिन जाधव, येनकीचे माजी सरपंच हरिभाऊ घुले, मिरीचे प्रगतशील बागायतदार रफीक पटेल, प्रभाकर पाटील, श्रीधर माने, सिध्देश्वर मोरे, नंदकुमार आतकरे, भानुदास गावडे, जकराया देवस्थानचे पुजारी व बिरू जाधव, तानाजी गुंड, जकराया शुगरचे शेती अधिकारी नानासाहेब बाबर, चिफ इंजिनियर कुबेरदास कलुबर्मे, चिफ़ केमिस्ट सुब्राव पडसाळकर, फायनान्स मॅनेजर बंडोपंत साठे, अधिकारी, कर्मचारी तसेच भागातिल सभासद शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कारखाण्याचे केन मॅनेजर विजय महाजन यांनी केले, तर आभार प्रशासकीय अधिकारी जकराया वाघमारे यांनी मानले.

No comments:
Post a Comment