माढ्याच्या विकासासाठी निधी देऊ-पालकमंत्र्यांचे नगरसवेक शहाजी साठे यांना आश्वासन

माढा (कटूसत्य वृत्त):- माढा शहरातील विविध विकास कामांसाठी निधी देण्याची मागणी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे -पाटील यांच्याकडे नगरसेवक शहाजी साठे व काँग्रेसच्या किसान विभागाचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष संदीप साठे यांनी केली.
सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर पालकमंत्री विखे पाटील आले असता दोघा साठेंनी त्यांचा सन्मान केला असुन आमदार सुभाष देशमुख,आमदार सचिन कल्याणशेट्टी,युवा सेना जिल्हा प्रमुख प्रियदर्शन साठे यांचेसमवेत भेट घेतली.यावेळी साठे यांनी पालकमंत्र्यांशी विविध समस्यांबाबत चर्चा करुन माढा नगरपंचायत च्या करविभागात झालेल्या पावणे नऊ लाख रुपयांच्या अपहाराबाबत लक्ष घालावे.माढा शहराला पाणी पुरवठा होणाऱ्या येवती जलाशयातुन माढ्याला येणारी पाईपलाईन अनेक ठिकाणी खराब झाली असुन त्याच्या दुरुस्ती साठी निधी मिळावा यासह शहराच्या भरीव सर्वांगीण विकासासाठी आपल्या स्तरावरून निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली.यावर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी निधी उपलब्ध करुन देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन साठे यांना दिले.याप्रसंगी माढा नगरपंचायतचे माजी नगरसेवक समिर सापटणेकर,युवा सेना जिल्हा प्रमुख प्रियदर्शन साठे आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment