लोकनेते कारखाना काटकसरी व पारदर्शी कारभार असा लौकीक असणारा कारखाना- आ. यशवंत माने - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, October 6, 2022

लोकनेते कारखाना काटकसरी व पारदर्शी कारभार असा लौकीक असणारा कारखाना- आ. यशवंत माने

 लोकनेते कारखाना काटकसरी व पारदर्शी कारभार असा लौकीक असणारा कारखाना- आ. यशवंत माने

                              

लोकनेते बाबुराव पाटील कारखान्याचा १९ वा गळीत हंगामातील गव्हाण, काटा पूजन आणि मोळी प्रदान शुभारंभ

                                   

मोहोळ (कटूसत्य वृत्त):- अतिरिक्त उसाचा प्रश्न सोडवण्याच्या उदात्त धोरणाने सुरू झालेला लोकनेते बाबुराव पाटील कारखाना हा काटकसरी व पारदर्शी कारभार असा लौकीक असणारा कारखाना ठरला आहे. शरदचंद्र पवार अजितदादा पवार यांच्या बहुमोल सहकार्यातून उभारणी झालेल्या या  कारखान्यावर राष्ट्रवादीचे घडयाळाचे चिन्ह लावून या कारखान्याने सातत्याने कृतज्ञता भाव जपल्याचे गौरवोदगार मोहोळचे आमदार यशवंत माने यांनी काढले.
लक्ष्मीनगर,अनगर येथील लोकनेते बाबुराव पाटील ॲग्रो इंडस्ट्रीज कारखान्याच्या सन २०२२-२०२३ वर्षाच्या एकाणीसाव्या गळीत हंगामातील गव्हाण, काटा पूजन आणि मोळी प्रदान शुभारंभ प्रसंगी उपस्थित ऊस उत्पादकांना मार्गदर्शन करताना आमदार माने बोलत होते.
यावेळी गव्हाण आणि काटा पूजन श्री सत्यनारायण महापूजा नानासाहेब डोंगरे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. संगीता  या उभयतांच्या हस्ते पार पडली. तर  आ.यशवंत माने,माजी आमदार राजन पाटील, चेअरमन बाळराजे पाटील, युवा नेते अजिंक्यराणा पाटील यांच्या हस्ते मोळी प्रदान समारंभ पार पडला.
यावेळी कारखान्याचे संस्थापक -अध्यक्ष राजन पाटील,राजश्री राजन पाटील, डॉ. विनिता अदीत्य गोरे, बाळराजे पाटील,प्रियंका बाळराजे पाटील, प्राजक्ता अजिंक्यराणा पाटील, कार्यकारी संचालक ओमप्रकाश जोगदे, तावजी बाळराजे पाटील, सभापती रत्नमाला पोतदार,बाजार समिती सभापती अस्लमभाई चौधरी, संचालक शुक्राचार्य हावळे, संदीप पवार, अशोक चव्हाण, संभाजी चव्हाण, नागेश साठे, देवानंद गुंड- पाटील, नानासाहेब डोंगरे, भारत सुतकर, दिपक माळी, प्रमोद डोके, मुस्ताक शेख, हेमंत गरड, महेश पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी अस्लम चौधरी,दिपक माळी,देवानंद गुंड -पाटील,महेश पवार,नानासाहेब डोंगरे यांनीही आपल्या मनोगतातून कारखान्याच्या वाटचालीबद्दल कौतुक व्यक्त करत गळीत हंगामासाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी सूत्रसंचालन प्रा सत्यवान दाढे यांनी तर आभार अजिंक्यराणा पाटील यांनी मानले.






No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages