आष्टी उपसा जलसिंचन योजनेच्या अर्धवट राहिलेल्या कामाला निधी उपलब्ध करून देण्याची मागणी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, October 7, 2022

आष्टी उपसा जलसिंचन योजनेच्या अर्धवट राहिलेल्या कामाला निधी उपलब्ध करून देण्याची मागणी

 आष्टी उपसा जलसिंचन योजनेच्या अर्धवट राहिलेल्या कामाला निधी उपलब्ध करून देण्याची मागणी


पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी वरदायिनी ठरलेल्या आष्टी उपसा जलसिंचन योजनेच्या अर्धवट राहिलेल्या कामाला निधी उपलब्ध करून देण्याची मागणी सोलापूर जिल्हा काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष  देवानंद गुंड पाटील यांनी पालकमंत्र्यांकडे केली आहे.



        सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार  राधाकृष्ण विखे पाटील पंढरपूर येथे आले असता देवानंद पाटील यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी पाटील यांनी पूर्वी असलेल्या शिवसेना-भाजप युती सरकारने आष्टी उपसा सिंचन योजना सुरू केली होती परंतु सध्या त्या योजनेचे काम निधी अभावी रखडलेले आहे, सदर रखडलेल्या अर्धवट कामांसाठी वीस कोटी रुपयांचा निधी द्यावा अशी मागणी देवानंद पाटील यांनी एका निवेदनाद्वारे पालकमंत्री विखे पाटील यांच्याकडे केलेली आहे.



No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages