भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, October 15, 2022

भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी

 भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी

मोहोळ (कटूसत्य वृत्त):- श्री संत तुकाराम सार्वजनिक वाचनालय सोहाळे तालुका मोहोळ येथे भारताचे माजी राष्ट्रपती मिसाईल मॅन थोर शास्त्रज्ञ जागतिक कीर्तीचे संशोधक भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी करण्यात आली सुरुवातीला वाचनालयाचे वाचक महादेव नरहरी जगताप यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले दररोज वाचन करूया व आपले जीवन समृद्ध करूया अशी प्रतिज्ञा सर्व वाचकांनी व ग्रामस्थांनी यावेळी केली या कार्यक्रमाला दररोजचे वाचक संतोष चव्हाण उत्तम पाटील पप्पू चव्हाण आदिनाथ जगताप भैय्या पाटील रमेश सावकार यासह ग्रामस्थ व वाचक मंडळी बहुसंख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार व सूत्रसंचालन वाचनालयाचे ग्रंथपाल हरिश्चंद्र चटे यांनी केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages