मनपा आरोग्य विभाग "माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियाना अंतर्गत"बाह्य संपर्क आरोग्य शिबिर, नई जिंदगी प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे शिबिर सुरू
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- मानवता विकास मंडळ संचलित पंचशील प्राथमिक व माध्यमिक प्रशालेत आज दिनांक 15 ऑक्टोबर रोजी डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतनिमित्त सोलापूर महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने पंचशील प्रशालेमध्ये बाह्य संपर्क आरोग्य शिबिर व माता सुरक्षित तर घर सुरक्षित शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाप्रसंगी प्रभाग 21 च्या नगरसेविका वहिदाबी शेख ,डॉ.गीता गावडे डॉ.मुजावर साहेब सौ वैशाली पवार, सुनिता गवंडी ,पूर्णिमा चांदणेरी, अश्विनी माशाळे, सुवर्णा पाटील, यासार शेख, झीनत शेख, महानंदा कोळी, तसलीम रंगरेज, दिलशाद मणियार ,हिना मंगलगिरी, बिस्मिल्ला पिरजादे ,फरहद शेख, सुमन खडतरे, सरफराज मुल्ला, कौसर ताडपत्री, ममता सय्यद, महानंदा शिंदे ,रोहित मुल्ला , शिबिरासाठी कार्य करत आहेत.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ एपीजे अब्दुल कलाम व दलित मित्र कालकथीत नागनाथजी रणधिरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर डॉ. गीता गावडे यांनी शिबिराचे महत्त्व सांगितले.
कार्यक्रमासाठी प्रशातील प्रशालेतील सर्व शिक्षक आरोग्य विभागातील सर्व कर्मचारी व परिसरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब चटे यांनी व आभार प्रदर्शन संजीवकुमार कलशेट्टी यांनी केले.

No comments:
Post a Comment